मुंबई: भारताच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार रोहित शर्मा फिट आहे आणि अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सहा फेब्रुवारीपासून तीन वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यासोबत सुरू होत असलेल्या मर्यादित ओव्हरच्या सहा सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. दरम्यान, या आठवड्यात होणाऱ्या निवड समितीची बैठक रोमहर्षक होणार आहे कारण दक्षिण आफ्रिकेत ०-३ने वनडे मालिकेत क्लीनस्वीप मिळाल्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विनसारख्या वरिष्ठ खेळाडूंचे स्थान धोक्यात येऊ शकते. This players in danger position for india vs west indies tour
डाव्या पायाचे स्नायू खेचले गेल्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर झालेला रोहित संघाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-२० सामने कोलकातामध्ये १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड(बीसीसीआय)च्या एका सूत्रांनी पीटीआयला नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले, रोहित वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी फिट आणि उपलब्ध आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका सुरू होईपर्यंत रोहितला रिहॅबिलिटेशनला साडे सात आठवड्यांपेक्षा जास्त वेळ होईल.
अधिक वाचा - बुलेट-ॲव्हेंजर सारख्याच इलेक्ट्रिक बाइकची झाली एन्ट्री
सूत्रांनी सांगितले, त्याने मुंबईत आधी ट्रेनिंग सुरू केली आहे आणि फिटनेस परीक्षणासाठी त्याला बंगळुरूला जाण्याची आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून औपचारिक स्वीकृती मिळवण्याची आशा आहे. हे नक्की आहे की सध्या रोहितला कसोटी कर्णधार बनवले जाणार आहे. बीसीसीआय दरम्यान, २०२२ आणि २०२३मध्ये सलग दोन वर्ल्डकपमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी आणि कामाच्या ओझ्यांबाबत अन्य पर्यायांवरही विचार करत आहे.
असं मानलं जात आहे की लोकेश राहुलचे कर्णधाराच्या रूपात पहिल्या मालिकेत अपेक्षेइतकी कामगिरी झाली नाही. सध्या त्याला रोहितच्या मार्गदर्शनाखाली राहावे लागेल. राहुलच्या नेतृत्वात भारताने दक्षिण आफ्रिकेत चार आंतरराष्ट्रीय सामने गमावले आणि भारतीय क्रिकेटमध्ये निर्णय घेणाऱ्या लोकांचे मत आहे की तो कर्णधार म्हणून पुढे होत नेतृत्व करू शकत नाही. असं मानलं जात आहे की इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी सत्रात लखनऊ सुपर जायटंसचा कर्णधार म्हणन राहुलच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा असतील.
अधिक वाचा - 28 जानेवारीला आहे षटतिला एकादशी
खराब फॉर्मात असलेल्या भुवनेश्वर कुमारला बाहेर केले जाऊ शकते. अश्विनला आणखी एका मालिकेत संधी दिली जाऊ शकते. दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या ओव्हरची मालिका ही वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे पुनरागमन होते. आवेश खान आणि हर्षल पटेलसारख्या वेगवान गोलंदाजांना पु्न्हा टी-२० संघात स्थान मिळू शकते.