IND vs SA: Virat Kohli नाही करणार या खेळाडूंची चुकी माफ, पुढच्या सामन्यात बाहेरचा रस्ता?

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Dec 31, 2021 | 12:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs South Africa Test series: भारताने द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. या सामन्यात अनेक खेळाडू फ्लॉप ठरले. अशातच दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

team india
पुढच्या सामन्यात या खेळाडूंना मिळणार बाहेरचा रस्ता? 
थोडं पण कामाचं
  • भारताने पहिला सामना जिंकला
  • राहुलने लगावले शतक
  • भारताने रचला इतिहास

मुंबई: भारताने द. आफ्रिकेविरुद्धच्या(india vs south africa test series) पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने(team india) या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अनेक खेळाडू चांगली कामगिरी करू  शकले नाही. अशातच कर्णधार विराट कोहली(captain virat kohli) दुसऱ्या कसोटी सामन्यात या खेळाडूंना बेंचवर बसवून दुसऱ्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. This players may be out of team in second test match against south africa

चेतेश्वर पुजारा

एकेकाळी टीम इंडियाची वॉल अशी म्हटल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराचा फॉर्म ही सगळ्यांसाठीच डोकेदुखी बनली आहे. त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाही आहेत. पुजारा क्रीझवर टिकूच शकत नाही आहे. तो लवकर बाद होताच मधल्या फळीवर जास्त दबाव येतो. द. आफ्रिकेविरुद्धच्या हिल्या कसोटीतील पहिल्या डावात पुजारा पूर्णपणे फ्लॉप झाला. त्याला पहिल्या डावात एकही धाव काढता आली नाही तर दसऱ्या डावात पुजाराला केवळ १६ धावा करता आल्या. पुजारा २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावू शकलेला नाही. त्याच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार विराट कोहली त्याला दुसऱ्या कसोटीत बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. पुजाराच्या जागी युवा क्रिकेटर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती. 

अजिंक्य रहाणे

भारताच्या स्टार फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेची बॅट गेल्या अनेक महिन्यांपासून धावांच्या प्रतीक्षेत आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही तो काही जास्त कमाल दाखवू शकलेला नाही. पहिल्या डावात त्याने ४८ आणि दुसऱ्या डावात तो २० धावा करून बाद झाला. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला उपकर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. त्याच्या जागी विराट दुसऱ्या कसोटीत हनुमा विहारीला संधी देऊ शकतो. 

भारताचा ऐतिहासिक विजय

द. आफ्रिकेविरुद्ध भारताने कसोटी सामना जिंकत इतिहास रचला. भारताने सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदा एखादा कसोटी सामना जिंकलेला आहे. टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज यांनी दोघांनी चांगली कामगिरी केली. भारताकडून केएल राहुलने तुफाने शतक झळकावले. त्याने १२२ धावा केल्या. तर मयांक अग्रवालने ६० धावांचे योगदान दिले. भारताच्या गोलंदाजांसमोर द. आफ्रिकेचे फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी