IND vs AUS: दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ ठरली! या खेळाडूंचा देणार बळी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 23, 2022 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

India vs Australia 2nd T20: दुसऱ्या टी-२० सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या टी-२० सामन्यात प्लेईंग इलेव्हनमधून काही फ्लॉप खेळाडूंचा बळी देऊ शकतात. 

rohit sharma
दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ ठरली!  
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाने पहिला टी-२० सामना(t-20 match) जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
  • अशातच दुसरा टी२० सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे.
  • कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) दुसऱ्या टी-२०सामन्यात प्लेईंग इलेव्हनमधून काही फ्लॉप खेळाडूंचा बळी देऊ शकतो

मुंबई: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी २३ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला टी-२० सामना(t-20 match) जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अशातच दुसरा टी२० सामना भारतासाठी करो वा मरो असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) दुसऱ्या टी-२०सामन्यात प्लेईंग इलेव्हनमधून काही फ्लॉप खेळाडूंचा बळी देऊ शकतो. जाणून घेऊया कोण असू शकतात प्लेईंग ११मध्ये...This playing 11 will play against Australia in second t-20 match

अधिक वाचा - महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात महिला पितात जास्त दारू

ओपनिंग जोडी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह सलामीसाठी केएल राहुल उतरेल. पहिल्या टी-२० सामन्यात राहुलने फॉर्म परत मिळवताना शानदार ५५ धावा ठोकल्या. तर कर्णधार रोहित शर्मा केवळ ११ धावा करून बाद झाला होता. अशातच रोहित दुसऱ्या टी-२० सामन्यात मोठा स्कोर करण्यासाठी सज् आहे. रोहित शर्मा तुफानी बॅटिंग करण्यात प्रसिद्ध आहे आणि काही बॉलमध्येच सामन्याचे चित्र बदलू शकतो. रोहित शर्मा जर क्रीजवर टिकला तर मोठा स्कोर करू शकतो. 

नंबर ३

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०सामन्यात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. विराट कोहलीला दुसऱ्या टी-२० मध्ये कमाल करावी लागेल. पहिल्या टी-२० सामन्यात विराट केवळ २ धावा करून बाद झाला होता. 

नंबर ४

सूर्यकुमार यादव नंबर ४वर खेळणे निश्चित मानले जात आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादवने २५ बॉलमध्ये ४६ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय चाहत्यांना सूर्यकुमार यादवकडून अशीच मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 

नंबर ५

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्या पाचव्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. सध्या पांड्या शानदार फॉर्मात आहे. पहिल्या टी-२० मध्ये ३० बॉलमध्ये ७१ धावांची खेळी केली होती. मात्र भारताला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. 

दिनेश कार्तिक असेल विकेटकीपर

मिडल ऑर्डरमध्ये नंबर ६साठी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची निवड होणे निश्चित आहे. 

अक्षर पटेल ऑलराऊंडर

अक्षऱ पटेल गोलंदाजीशिवाय फलंदाजीही जबरदस्त करतो. अक्षऱ पटेलने आपल्या गोलंदाजीने सामन्याचे चित्र बदलले आहे. 

स्पिन डिपार्टमेंट

स्पिन डिपार्टमेंटमध्ये युझवेंद्र चहलच्या जागी रवीचंद्रन अश्विनला प्लेईंग ११मध्ये स्थान मिळू शकते. 

हे असतील वेगवान गोलंदाज  

वेगवान गोलंदाजासाठी प्लेईंग ११मध्ये भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांना स्थान दिले आहे. 

कर्णधार या खेळाडूंचा देणार बळी

दुसऱ्या टी२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज उमेश यादवला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करू शकतात. यादवच्या जागी जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलच्या जागी रवीचंद्रन अश्विन दुसऱ्या टी-२० साठी रोहितची पसंती असेल. 

अधिक वाचा - दिव्यांका त्रिपाठी बिग बॉस 16 मध्ये दिसणार का?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी२०मध्ये भारताचे प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार)
केएल राहुल 
विराट कोहली
सूर्यकुमार यादव
हार्दिक पांड्या
दिनेश कार्तिक (विकेटकीपर)
अक्षर पटेल
आर अश्विन
हर्षल पटेल
भुवनेश्वर कुमार
जसप्रीत बुमराह  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी