cricketers: हे ६ स्टार क्रिकेटर्स आधी बनले वडील नंतर केले लग्न

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 05, 2022 | 17:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

cricketers: ३० जुलै २०२०ला हार्दिक पांड्याने खुलासा केला की त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट आहे आणि तो बाब होणार आहे. हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले.

hardik pandya
हे ६ स्टार क्रिकेटर्स आधी बनले वडील नंतर केले लग्न 
थोडं पण कामाचं
  • हे क्रिकेटर्स लग्न करण्याआधीच आपल्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर बाप बनले आहेत
  • क्रिकेटर्सच्या या लिस्टमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे.
  • हार्दिक पांड्या हा एक असा भारतीय क्रिकेटर आहे जो लग्नाआधीच बाबा बनला.

मुंबई: वर्ल्ड क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटर आहे ज्यांनी प्रेमात पडल्यावर बाप होण्याचे सुख लग्नाआधी अनुभवले. हे क्रिकेटर्स लग्न करण्याआधीच आपल्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर बाप बनले आहेत. क्रिकेटर्सच्या या लिस्टमध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे. नजर टाकूया या क्रिकेटर्सवर...

हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या हा एक असा भारतीय क्रिकेटर आहे जो लग्नाआधीच बाबा बनला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने जानेवारी २०२०मध्ये बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोविकसोबत दुबईत साखरपुडा केला होता. ३० जुलै २०२०ला हार्दिकने खुलासा केला की त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नंट आहे आणि तो बाबा बनणार आहे. हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले. 

ज्यो रूट

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Joe Root (@root66)

इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटही या यादीत सामील आहे. ज्यो रूटही लग्नाशिवाय बाबा झालेला क्रिकेटर आहे. २०१४पासून तो आपली गर्लफ्रेंड कॅरी कॉरटेलला डेट करत होता. टी-२०वर्ल्डकपआधी २०१६मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता त्यानंतर लग्न न करताच ज्यो रूट बाबा बनला होता. ७ जानेवारी २०१७मध्ये ज्यो रूटचा मुलगा अलफ्रेडचे लग्न केले. यानंतर या कपलने लग्न केले होते. 

डेविड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर डेविड वॉर्नर लग्न न करताच बाबा बनला. २०१४मध्ये डेविड वॉर्नरची गर्लफ्रेंड कँडिसने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला होता. २०१५मध्ये डेविड वॉर्नरने कँडिसशी लग्न केले होते. वॉर्नरला तीन मुली इवी, इंडी आणि इसला आहे. 

इमरान खान

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Imran Khan (@imrankhan.pti)

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इमरान खानही लग्न न करता बाबा बनला होता.. इमरानचे संबंध सीता व्हाईटशी होते. सीता आणि इमरान यांच्या १९८७-८८मध्ये सुरू झाले आणि १९९१मध्ये दोघे जवळ आले. १९९२मध्ये एका मुलाचा जन्म झाला. हा इमरानचा मुलगा होता. त्याने सुरूवातीला हे स्वीकारण्यास नकार दिला नंतर डीएनए तपासणीत ही बाब समोर आली. 

व्हिव्हियन रिचर्ड्स

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Seetageeta (@seetageetacom)

१९८०च्या भारत दौऱ्यावर आलेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स यांची भेट भारताच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांच्याशीझाली. दोघांचे बराच काळ अफेयर सुरू होते. दोघेही लिव्ह इनमध्ये होते. १९८९मध्ये नीनाने एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव मसाबा आहे. व्हिव्हियन रिचर्ड्स यांचे लग्न मरियमशी झाले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. 

क्रिस गेल

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allysa Berridge (@allys_a)

जगातील सर्वात विस्फोटक फलंदाज क्रिस गेलही या यादीत सामील आहे. तोही लग्न न करता बाप बनला आहे. २०१७मध्ये जेव्हा आयपीएल सुरू होते तेव्हा त्याची भेट गर्लफ्रेंड नताशा बॅरिजने एका मुलीला जन्म दिला होता. क्रिस गेलचे नाव अनेक वादांशी जोडले गेले आहे.. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी