हैदराबादच्या अडचणी आणखीनच वाढल्या, आता या चॅम्पियनने सोडली टीम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 24, 2021 | 13:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

आयपीएल २०२१चा हंगाम सनरायजर्स हैदराबादसाठीचा आतापर्यंतचा सगळ्यात वाईट हंगाम आहे. संघ सध्या पॉईट्सटेबलमध्ये ८पैकी ७ सामन्यांतील पराभवांसह आठव्या स्थानावर आहे. 

rutherford
हैदराबादच्या अडचणीत वाढ, हा चॅम्पियन गेला सोडून 
थोडं पण कामाचं
  • केन विल्यमसन्सच्या नेतृत्वात खेळत असलेल्या हैदराबादच्या अडचणी या हंगामात एकामागोमाग एक वाढतच आहेत.
  • आयपीएल फ्रेंचायजीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेरफेन रुदरफोर्डने माघार घेतल्याची माहिती दिली.
  • ज्यामुळे तो आयपीएलचे बायोबबल सोडून तातडीने आपल्या घरी रवाना झाला आहे. 

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२१मध्ये(ipl 2021) काव्या मारनचा संघ सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही आहे. आधी जॉनी बेअरस्ट्रॉने यूएई हंगामातून आपले नाव परत घेतले त्यानंतर त्याच्या जागी संघात सामील करण्यात आलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज शेरफेन रूदरफोर्डनेही आता संघाची साथ सोडली आहे. याआधी मंगळवारी टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता यानंतर त्याच्यासह ऑलराऊंडर विजय शंकरसह ७ जणांना आयसोलेट करण्यात आले होते. 

केन विल्यमसन्सच्या नेतृत्वात खेळत असलेल्या हैदराबादच्या अडचणी या हंगामात एकामागोमाग एक वाढतच आहेत. आयपीएल फ्रेंचायजीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेरफेन रुदरफोर्डने माघार घेतल्याची माहिती दिली. या कॅरेबियन खेळाडूच्या वडिलांचे निधन झाले आहे ज्यामुळे तो आयपीएलचे बायोबबल सोडून तातडीने आपल्या घरी रवाना झाला आहे. 

फ्रेंचायजीने ट्विटरवर लिहिले की शेरफेन रुदरफोर्डच्या वडिलांचे निधन झाल्याबाबत त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. तो आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर पडत आपल्या घरी जात आहे आणि या कठीण काळात तो आपल्या कुटुंबियांसोबत असणार आहे. 

रुदरफोर्डला दुसऱ्या टप्प्यात सनरायजर्स हैदराबादने जॉनी बेअरस्ट्रॉच्या जागी सामील केले होते. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सविरु्धच्या या टप्प्याती पहिल्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली होती. त्याने ११ सामन्यांत २६२ धावा केल्या होत्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्याने आपली टीम सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

सनरायजर्स हैदराबासाठी हा हंगाम आतापर्यंत खूपच वाईट गेला आहे.संघाने ८ सामन्यांमधील तब्बल ७ सामने गमावलेत तर केवळ एकच सामना जिंकला. ते पॉईंटटेबलमध्ये ८व्या स्थानावर आहेत. याशिवाय स्टार ओपनर जॉनी बेअर स्ट्रॉचे जाणे, त्यानंतर टीम इंडियामध्ये स्थान मिळणाऱ्या टी नटराजनला कोरोना होणे, विजय शंकर आयसोलेट होणे आणि आता शेरफेन रुदरफोर्ड संघातून जाणे हे एकामागोमागचे झटकेच आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी