T-20: इतका लहान टी-२० आंतरराष्ट्रीय सामना, २० चेंडूत जिंकला संघ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 21, 2022 | 13:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

T20 Match: आफ्रिकेच्या बेनोनीमध्ये खेळवण्यात आलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कॅमेरून संघाने १४.२ ओव्हरमध्ये केवळ ४८ धावा बनवल्या. त्यानंतर केनियाने केवळ २० बॉलमध्ये सामना जिंकला. 

cricket
इतका लहान टी-२० आंतरराष्ट्रीय सामना, २० चेंडूत जिंकला संघ 
थोडं पण कामाचं
  • केनिया आणि कॅमेरून यांच्यात आफ्रिका क्रिकेट असोसिएशन कप सामना बेनोनीमध्ये खेळवण्यात आला.
  • १९ सप्टेंबरला झालेल्या या सामन्या कॅमेरून संघाने १४.२ ओव्हरमध्ये सर्व विकेट गमावताना ४८ धावा केल्या होत्या.
  • संघाचा केवळ एकच फलंदाज ब्रुनो टुबे दुहेरी धावसंख्या गाठू शकला होता.

मुंबई: टी-२० फॉरमॅटमधील(t-20 format) सामन्यात अनेकदा रोमहर्षक खेळ पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता ताणलेली असते. जर या फॉरमॅटमधील आंतरराष्ट्रीय सामना असेल तर अपेक्षा अधिकच असतात. नुकत्यात दक्षिण आफ्रिकेत(south africa) खेळवण्यात आलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एका संघाला विजयासाठी केवळ २० बॉलच खेळावे लागले. या सामन्यात दोन्ही संघांकडून एकूण मिळून १०६ बॉल टाकण्यात आले. पहिल्यांदा फलंदाजी(batting)) करणारा संघ २० ओव्हर खेळला आणि त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३.२ ओव्हरमध्येच विजय मिळवा. This t-20 match finishes in only 20 balls

अधिक वाचा - लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने खोदले खड्डे, पालिकेकडून दंड

१०० बॉल राखत मिळवला विजय

केनिया आणि कॅमेरून यांच्यात आफ्रिका क्रिकेट असोसिएशन कप सामना बेनोनीमध्ये खेळवण्यात आला. १९ सप्टेंबरला झालेल्या या सामन्या कॅमेरून संघाने १४.२ ओव्हरमध्ये सर्व विकेट गमावताना ४८ धावा केल्या होत्या. संघाचा केवळ एकच फलंदाज ब्रुनो टुबे दुहेरी धावसंख्या गाठू शकला होता. या संघाला १० धावा एक्स्ट्रा मिळाल्या होत्या. 

त्यानतंर केनियाने ३.२ ओव्हरमध्ये म्हणजेच १०० ओव्हर बाकी असताना सामना जिंकला. त्यांनी या दरम्यान एक विकेटही गमावला. सुखदीप सिंह १० बॉलमध्ये २६ धावा करत नाबाद परतला. 

चौथ्यांदा झाली ही कमाल

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॉल राखत जिंकण्याच्या बाबतीत हा सामना चौथ्या स्थानी आहे. ऑस्ट्रिया या सामन्यात टॉपवर आहे. त्यांनी २०१९ या वर्षात वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. ऑस्ट्रिया २०१९मध्ये तुर्कीविरुद्ध सामन्यात १०४ बॉल राखत १० विकेटनी विजय मिळवला होता. ओमानने फिलिपाईन्सविरुद्ध १०३ बॉल राखत ९ विकेटनी विजय मिळवला होता. लक्झ्मबर्गने तुर्कीला १०१ बॉल राखत ८ विकेटनी मात दिली होती. 

अधिक वाचा - दातातील कीड होईल दूर, घरच्या घरी बनवा ही हर्बल पावडर

केनियाच्या कर्णधाराची कमाल

या सामन्यात केनियाचे नेतृत्व शेम गोचे करत होता. त्याने गोलंदाजीत कमाल दाखवली आणि कॅमेरूनच्या फलंदाजांना खूप त्रास दिला. गोचेने दोन ओव्हरमध्ये केवळ १० धावा देत तीन विकेट मिळवल्या. त्याशिवाय यश तलातीने ४ ओव्हर गोलंदाजी केली आणि आठ धावा देत तीन विकेट मिळवल्या.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी