मुंबई: आशिया कप २०२२(asia cup 2022) स्पर्धेला अवघ्या काही दिवसांतच सुरूवात होतेय. यंदा यूएईमध्ये(uae) आशिया कप २०२२ खेळवला जात आहे. आशिया कप २०२२मध्ये भारत आपल्या अभियानाला २८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा सामना पाकिस्तानविरुद्ध(india vs pakistan) रंगणार आहे. या वर्षी टी-२० वर्ल्डकप(t-20 world cup) असल्याने आशिया कपही टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया कप २०२२मध्ये भारतासाठी पाकिस्तान नव्हे तर दुसरा संघ मोठा धोकादायक ठरू शकतो. This team is dangerous in Asia cup, India need to alert
अधिक वाचा - मोठी बातमी! कंपन्या ग्राहकांकडून बॅटर्या परत विकत घेणार
आशिया कपमध्ये टीम इंडियाला खास सांभाळून राहण्याची गरज आहे. हा संघ दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेश आहे. यांचा दिवस असला तर मोठमोठ्या दिग्गज संघांना मात देऊ शकतो. बांगलादेशने साधारण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक मोठमोठ्या संघांची स्वप्ने तोडली आहेत.
बांगलादेशनेच भारताला २००७मध्ये वनडे वर्ल्डकपमध्ये हरवत स्पर्धेतून बाहेर केले होते. यानंतर सचिन तेंडुलकरपासून ते वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडसारखे दिग्गज उदास झाले होते. बांगलादेशच इंग्लंडला २०१५मध्ये वर्ल्डकपमधून बाहेर काढले होते. २०१६च्या टी-२० वर्ल्डकपमध्येही बांगलादेशनेच साधारण टीम इंडियाला स्पर्धेतून बाहेर केले होते.
या स्पर्धेत एकूण ६ संघ भाग घेणार आहेत. भारत आणि पाकिस्तानशिवाय बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा संघ भाग घेणार आहेत. तर एक संघ क्वालिफायरच्या माध्यमातून आशिया कप २०२२ खेळणार आहे. या स्पर्धेतील सामने दुबई आणि शारजाहमध्ये खेळवला जाईल. याचे यजमानपद श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे आहे.
या ६ संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले गेले आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान आणि क्वालिफायर संघ आहे. बी ग्रुपमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ आहेत. टीम इंडिया आपला पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळणार तर दुसरा सामना ३१ ऑगस्टला क्वालिफायर संघाविरुद्ध खेळवला जाईल. यानंतर सुपर ४चे सामने सुरू होतील. १६ दिवसांत फायनलसह १३ सामने खेळवले जाणार आहेत.
अधिक वाचा - मुलाला पार्टनर न मिळाल्याने ६४ वर्षीय आईच उतरली कोर्टात
२७ ऑगस्ट शनिवार श्रीलंका वि अफगाणिस्तान
२८ ऑगस्ट रविवार भारत वि पाकिस्तान
३० ऑगस्ट मंगळवार बांगलादेश वि अफगाणिस्तान
३१ ऑगस्ट बुधवार भारत वि क्वालिफायर
१ सप्टेंबर गुरूवार श्रीलंका वि बांगलादेश
२ सप्टेंबर शुक्रवार पाकिस्तान वि क्वालिफायर
३ सप्टेंबर शनिवार बी १ वि बी २ सुपर ४
४ सप्टेंबर रविवार ए १ वि ए २ सुपर ४
६ सप्टेंबर मंगळवार ए १ वि बी १ सुपर ४
७ सप्टेंबर बुधवार ए २ वि बी २ सुपर ४
८ सप्टेंबर गुरूवार ए १ वि बी २ सुपर ४
९ सप्टेंबर शुक्रवार बी १ वि ए २ सुपर ४
११ सप्टेंबर रविवार फायनल सामना
सर्व सामने संध्याकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतील.