तीन क्रिकेटपटू ज्यांना आयपीएलच्या लीलावात खरेदी न केले जाणे ठरले आश्चर्यकारक, आता मिळणार प्रवेश?

List of Big Unsold players in IPL 2021 Auction: आयपीएल 2021च्या लीलावात अनेक खेळाडू असे होते ज्यांना कुणीच खरेदी केले नाही. यात काही मोठ्या नावांचाही समावेश होता ज्यातील काही नावे आश्चर्यकारक होती.

Aaron Finch
तीन क्रिकेटपटू ज्यांना आयपीएलच्या लीलावात खरेदी न केले जाणे ठरले आश्चर्यकारक, आता मिळणार प्रवेश?  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • आयपीएल 2021च्या लीलावात अनेक खेळाडूंना मिळाला नाही वाली
  • विकल्या न गेलेल्या खेळाडूंमध्ये काही दिग्गज नावांचाही समावेश
  • या खेळाडूंना येत्या काळात मिळणार का आयपीएल 2021मध्ये प्रवेश?

आयपीएल 2021च्या (IPL 2021) लीलावात (auction) अनेक खेळाडू (players) विकले गेले आणि यातील काहींना मोठी रक्कम (big amount) मिळवण्यात यशही आले. एकीकडे काही खेळाडू बोलीबद्दल खुश दिसले, पण काही असेही होते ज्यांना रक्कम मोठी मिळाली, पण सोशल मीडियावर (social media) चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले. विकल्या गेलेल्या खेळाडूंशिवाय काही खेळाडू असेही होते ज्यांना कुणीच विकत घेतले नाही. यांची संख्या साधारण 72 होती. मात्र यात असेही काही खेळाडू आहेत ज्यांना येत्या काळात मालिकेत सरप्राईज प्रवेश (surprise entry) मिळू शकतो.

कोण आहेत यंदाच्या लीलावात विकले न गेलेले दिग्गज खेळाडू?

इथे आम्ही आपल्याला आयपीएलच्या लीलावात विकल्या न गेलेल्यांपैकी त्या तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना अजूनही मालिका खेळण्याची संधी मिळू शकते. नियमांनुसार जर एखाद्या संघाचा एखादा खेळाडू जखमी झाला किंवा इतर कोणत्याही कारणाने मालिकेबाहेर गेला तर त्याच्या जागी अन्य खेळाडूला सामिल केले जाऊ शकते ज्याचे नाव लीलावाच्या यादीत होते. त्यामुळे या 3 खेळाडूंचे नशीब उघडू शकते.

  1. अॅलेक्स हेल्स (इंग्लंड): इंग्लंडचा जबरदस्त फलंदाज अॅलेक्स हेल्सची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. मात्र त्याला या रकमेवरही कुणी विकत घेतले नाही. हे फारच चकित करणारे होते. कारण नुकताच तो ऑस्ट्रेलियाच्या टी-20 टूर्नामेंट बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला होता. त्याने यात 543 धावा काढून शानदार प्रदर्शन केले होते. त्यामुळे जर एखाद्या संघाला फलंदाजाची गरज भासली तर त्याला प्राधान्य मिळेल. आत्तापर्यंत तो फक्त एकदा आयपीएलमध्ये खेळला आहे जेव्हा 2018मध्ये सनरायजर्स हैदरबादचा डेव्हिड वॉर्नर जखमी झाल्याने त्याला संधी मिळाली होती.
  2. अॅरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया): मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अॅरॉन फिंच दिग्गज ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि महत्वाचा फलंदाज आहे. मात्र तरीही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्याला बाहेर काढले आणि लीलावात त्याला कुणीच खरेदी केले नाही. त्याचे आधारमूल्य 1 कोटी रुपये होते. फिंचला आयपीएल 2020च्या लीलावात बेंगळुरू संघाने 4.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण यूएईमध्ये झालेल्या या मालिकेत फारसा यशस्वी ठरला नाही. त्याने 12 सामन्यांमध्ये फक्त एका अर्धशतकासह 268 धावा काढल्या. मात्र भारतीय खेळपट्ट्यांवर तो किती प्रभावी ठरू शकतो हेही विसरून चालणार नाही.
  3. जेसन रॉय (इंग्लंड): 2019चा विश्वचषक ज्यांच्या लक्षात आहे ते चाहते इंग्लंडच्या जेसन रॉयची फलंदाजी विसरूच शकत नाहीत. इंग्लंडला पहिल्यांदा जगज्जेता बनवण्यात महत्वाची भूमिका या युवा सलामीवीराने बजावली होती. तो सतत चांगली फलंदाजी करत होता. त्याच्या नावावर फार सामने नसले तरी संघाला चांगली सुरुवात करून देण्यात तो यशस्वी ठरतो. जेसन रॉयने आत्तापर्यंत दोन आयपीएल खेळल्या आहेत ज्यात तो दिल्लीच्या संघात होता. 2017मध्ये त्याने 3 सामन्यांमध्ये 31 धावा काढल्या तर 2018मध्ये 5 सामन्यांमध्ये 120 धावा काढल्या ज्यात नाबाद 91 धावांची त्याची खेळी अविस्मरणीय आहे.

कुणाला मिळाली सर्वात जास्त किंमत?

आयपीएल 2021च्या लीलावात दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू क्रिस मॉरिस सर्वात महागडा खेळाडू ठरला. मॉरिसला राजस्थान रॉयल्सच्या संघाने 16 कोटी 25 लाख रुपये देऊन संघात घेतले. तर न्यूझीलंडचा काइल जेमिसन दुसऱ्या क्रमांकावर राहिला ज्याला मॉरिसच्या माजी संघ बेंगळुरूने 15 कोटी रुपये मोजून खरेदी केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी