Watch: लाईव्ह मॅचदरम्यान मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची निघाली पँट, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 31, 2022 | 12:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tim David Viral Video: मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये व्हाईटॅलिटी ब्लास्ट टी-२० स्पर्धा खेळत आहे. सामन्यादरम्यान चोकार रोखण्याच्या नादात या खेळाडूची पँटच निघाली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. 

tim david
लाईव्ह मॅचदरम्यान मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची निघाली पँट 
थोडं पण कामाचं
  • मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज टीम डेविड सध्या व्हाईटालिटी ब्लास्ट टी-२० स्पर्धेत लंकाशरसाठी खेळत आहे
  • २९ मेला लंकाशरचा सामना वर्सेस्टरशरशी झाला.
  • या सामन्यात टीम डेविडने २६ बॉलमध्ये ताबडतोब ६० धावांची खेळी केली.

मुंबई:  आईपीएल (IPL)मध्ये जबरदस्त खेळी केल्यानंतर अनेक परदेशी खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये व्हाईटॅलिटी ब्लास्ट टी२० स्पर्धेत(vitality blast t-20 tournament) खेळत आहेत. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा(mumbai indians) एक धाकड खेळाडूही खेळण्यास पोहोचला आहे. या खेळाडूच्या फलंदाजीची हवा येथेही पाहायला मिळाली मात्र लाईव्ह सामन्यादरम्यान या खेळाडूसोबत एक मजेदार किस्सा घडला जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. Tim David pant gone down during fielding in live match 

लाईव्ह मॅचमध्ये निघाली पँट

मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज टीम डेविड सध्या व्हाईटालिटी ब्लास्ट टी-२० स्पर्धेत लंकाशरसाठी खेळत आहे. २९ मेला लंकाशरचा सामना वर्सेस्टरशरशी झाला. या सामन्यात टीम डेविडने २६ बॉलमध्ये ताबडतोब ६० धावांची खेळी केली. मात्र सामन्यादरम्यान त्याच्यासोबत मजेदार घटना घडली. फिल्डिंगदरम्यान चौकार रोखण्याच्या नादात त्याची पँटच खाली आली. जेव्हा त्याची पँट खाली उतरली तेव्हा कमेंटेटरलाही आपले हसू आवरले नाही. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

येथे पाहा व्हिडिओ

IPL 2022 मध्ये केली होती धूम

टीम डेविडने आयपीएल २०२२मध्ये खेळवलेल्या ८ सामन्यांत ३७.२०च्या सरासरीने १८६ धावा केल्या होत्या. आयपीएल २०२२मध्ये त्याचा स्ट्राईक रेट २१६.२८ इतका राहिला होता. टीम डेविड याआधीही बंगळुरू संघाचा भाग होता. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२मध्ये टीम डेविडला ८.२५ कोटी रूपयांना खरेदी केले होते. हंगामाच्या शेवटच्या सामन्यांत टीम डेविडने कमालीची फलंदाजी केली होती. 

दिल्लीला केले होते बाहेर

मुंबई इंडियने्स आयपीएल २०२२च्या प्लेऑफच्या शर्यतीतून सगळ्यात आधी बाहेर पडली होती. मात्र मुंबई इंडियन्सकडे हंगामातील शेवटचा सामना खेळत दिल्ली कॅपिटल्सला बाहेर काढण्याची संधी होती. या सामन्यात टीम डेविडने ११ बॉलमध्ये ३४ धावांची खेळी करत दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले होते. या डावात त्याने २ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी