ऍशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये आलं वादळ, 'अश्लील मेसेज' प्रकरणी टीम पेनने सोडले कर्णधारपद

Tim Paine resign from captaincy: टीम पेनने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊन धक्का दिला आहे.  पेनवर महिला सहकाऱ्याला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप होता. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

tim paine quits as australia test captain before ashes series for sending inappropriate private message to lady colleague
'अश्लील मेसेज' प्रकरणी टीम पेनने सोडले कर्णधारपद 
थोडं पण कामाचं
  • टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे
  • पेन यांनी होबार्ट येथे पत्रकार परिषदेत राजीनामा जाहीर केला
  • मार्च 2018 मध्ये टीम पेनची ऑस्ट्रेलियाचा 46 वा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Tim Paine resign from captaincy। नवी दिल्ली: महिला सहकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने शुक्रवारी कर्णधारपदावरून पायउतार झाला. काही आठवड्यांनंतर ऑस्ट्रेलियाला कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका खेळायची आहे. रिपोर्टनुसार, क्रिकेट तस्मानियाच्या एका महिला कर्मचाऱ्याने दावा केला आहे की पेनने तिला त्याच्या गुप्तांगांच्या छायाचित्रांसह अश्लील संदेश पाठवले. पेन ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहणार आहे. (tim paine quits as australia test captain before ashes series for sending inappropriate private message to lady colleague)

तो म्हणाला, 'हा खूप कठीण निर्णय आहे पण माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य निर्णय आहे. त्या घटनेबद्दल मी माफी मागितली आणि आजही आहे. मी माझ्या पत्नी आणि कुटुंबाशी देखील बोललो आणि त्यांच्या माफी आणि सहकार्याबद्दल मी आभारी आहे.

टीम पेनने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलिया नवा टेस्ट कॅप्टन असू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी