टाइम्स ऑफ इंडियाचा शानदार विजय, प्रशांतची भेदक गोलंदाजी, आशिष, परितोषची फटकेबाजी

मुंबईत चर्चगेटजवळील क्रॉस मैदानात सुरू असलेल्या इन्शुरन्स शिल्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

times of india win third match of insurance shield cricket t 20
टाइम्स ऑफ इंडियाचा शानदार विजय, प्रशांतची भेदक गोलंदाजी, आशिष, परितोषची फटकेबाजी  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : मुंबईत चर्चगेटजवळील क्रॉस मैदानात सुरू असलेल्या इन्शुरन्स शिल्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने दुसरा विजय मिळवत स्पर्धेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.  तीन साखळी सामन्यांच्या या स्पर्धेत टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लबने पहिल्या सामन्यांत कॅनरा बँकेचा ५ गडी राखून विजय मिळवला आहे. तर आजच्या सामन्यांत ओरिएंटल इन्शुरन्सला ९ गडी राखून विजय मिळवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाकडून भेदक गोलंदाजी करत प्रशांत जाधव याने तीन विकेट घेतल्या. तर आशिष सावंत आणि परितोष मोहितेने शानदार फलंदाजी करत सहज विजय मिळवला. 

प्रशांत जाधवची भेदक गोलंदाजी

ओरिएंटल इन्शुरन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा संपूर्ण संघ ८७ धावांत गारद झाला. ओरिएंटलकडून सचिन जगताप याने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर टाइम्सकडून प्रशांत जाधव याने ४ षटकात १ मेडन, १५ धावा देत तीन विकेट पटकावल्या. त्याला संदीप राणा २, परितोष मोहिते, पंकज सावंत, राकेश पुतरन यांना प्रत्येक १ विकेट घेऊन चांगली साथ दिली. 

आशिष  सावंत, परितोष मोहितेची फटकेबाजी

ओरिएंटलच्या ८८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना आशिष सावंत आणि परितोष मोहिते यांनी गोलंदाजांचाच चांगलाच समाचार घेतला. आशिष सावंत याने धुवाँधार फलंदाजी करत ४७ धावा केल्या. तर कर्णधार परितोष मोहिते याने नाबाद ३१ धावांचे खेळी केली. टाइम्स ऑफ इंडियाने हा सामना १०.३ षटकात खिशात घातला.  त्यामुळे त्याचा रन रेट वाढला आहे. 
आता रन रेटवरून टाइम्स ऑफ इंडिया सेना फायनल्समध्ये जाते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  टाइम्सने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दुसरा सामना केवळ १ धावेने गमावला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी