ठाणे : टाइम्स ऑफ इंडियाच्या पंकज सावंतने अवघ्या २७ धावांत पाच विकेट्सच्या जोरावर सेंच्युरी रेयॉन संघाचा पाच विकेट्सनी पराभव केला. ४६ व्या ठाणेवैभव इंटर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत आपली घोडदौड कायम ठेवली आहे.
ठाण्याच्या सेंट्रल मैदानात खेळल्या गेलेल्या सामन्यात पंकज सावंतच्या भेदक माऱ्यासमोर सेंच्युरी रेयॉनच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. शित रंभियाच्या नाबाद २७ धावा, दिनेश यादव आणि शिवकुमार कांतिअरच्या प्रत्येकी १६ धावामुळे सेंच्युरी रेयॉनला २० षटकात ८ बाद १२० धावांपर्यंत मजल मारता आली. अंकित गांधी याने दोन फलंदाज तंबूचा रस्ता दाखविला.
टाइम्स ऑफ इंडिया संघाने १२० धावांचा पाठलाग करताना १७ व्या ५ विकेट्सच्या मोबदल्यात १२१ धावा करत विजश्री संपादित केला. चिंतन गडाने ४४ धावा करत विजयाचा मार्ग सुकर केला. राकेश पुत्रनने नाबाद २४ धावा केल्या. दिनेश यादव, हिमांशू पटेल, पृथ्वी गोवारी आणि कैलास फरतने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
सेंच्युरी रेयॉन : २० षटकात ८ बाद १२० (शित रंभिया नाबाद २७, दिनेश यादव नाबाद नाबाद १६, शिवकुमार कांतिअर १६, पंकज सावंत ४-२७-५, अंकित गांधी ४-२७-२, अनिर्बन चौधरी ४-२२-१) पराभूत विरुद्ध
टाइम्स ऑफ इंडिया : १७ षटकात ५ बाद १२१ (चिंतन गडा ४४, राकेश पुत्रन नाबाद २४, दिनेश यादव ३-२४-१, हिमांशू पटेल २-२२-१, पृथ्वी गोवारी १-१४-१, कैलास फरत १-४-१).