चुरशीच्या सामन्यात टाइम्स ऑफ इंडियाचा थरारक विजय, कर्णधार परितोषचा विजयात 'परि'स्पर्श 

टाइम्स शिल्डच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात टाइम्स ऑफ इंडियाने हिंदुजा हॉस्पिटलचा  अखेरच्या षटकात दोन विकेट आणि एक चेंडू राखून शानदार विजय मिळविला.

Times of India's thrilling victory in clinch match, captain Paritosh's 'touch' in victory
चुरशीच्या सामन्यात टाइम्स ऑफ इंडियाचा थरारक विजय,  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टाइम्स शिल्डच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात टाइम्स ऑफ इंडियाने हिंदुजा हॉस्पिटलचा  अखेरच्या षटकात दोन विकेट आणि एक चेंडू राखून शानदार विजय मिळविला.
  • टाइम्स शिल्डच्या ई डिव्हिजनचे सामने यंदा पहिल्यांदा टी २० फॉरमॅटमध्ये खेळविले जात आहेत.

मुंबई :  टाइम्स शिल्डच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात टाइम्स ऑफ इंडियाने हिंदुजा हॉस्पिटलचा  अखेरच्या षटकात दोन विकेट आणि एक चेंडू राखून शानदार विजय मिळविला. कर्णधार परितोष मोहितेच्या ४२ धावांचा परिस्पर्श या विजयात मोलाचा ठरला आहे. त्याला प्रथमेश दुभाषी याने ३८ धावा करत चांगली साथ दिली. सुरूवातीला राकेश पुतरन याने शानदार गोलंदाजी करत ४ विकेट घेतल्या. टाइम्स ऑफ इंडियाने आता अंतीम १६ मध्ये स्थान मिळविले आहे. (Times of India's thrilling victory in clinch match, captain Paritosh's 'touch' in victory)

टाइम्स शिल्डच्या ई डिव्हिजनचे सामने यंदा पहिल्यांदा टी २० फॉरमॅटमध्ये खेळविले जात आहेत. आज एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबवरील सामन्यात टाइम्स ऑफ इंडियाच्या कर्णधार परितोष मोहिते  याने हिंदुजा हॉस्पिटल विरूद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हिंदूजा हॉस्पिटलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १२६ धावा केल्या. यात नंदू पाटील याने शानदार ५० धावा केल्या. त्याला अविनाश जाधव याने ३८ धावा करत चांगली साथ दिली. परंतु टाइम्स ऑफ इंडियाच्या राकेश पुतरन याने ४ षटकांत १९ धावा देत हिंदुजा हॉस्पिटलच्या ४ गडीना तंबूचा रस्ता दाखवला. यात त्याने एक ओव्हर निर्धावही टाकली.  पंकज सावंत याने टिच्चून गोलंदाजी करत २ विकेट तर अनिर्बन चौधरी याने १ विकेट घेतली. 

हिंदूजा हॉस्पिटलच्या १२६ धावांचा पाठलाग करताना कर्णधार परितोष मोहिते आणि प्रथमेश दुभाषी यांनी शानदार खेळी केली. प्रथमेश दुभाषी याने ३४ चेंडूत ३८ धावा केल्या.  परंतु परितोष याने पहिल्या षटकापासून अखेरच्या षटकापर्यंत किल्ला लढवला.  त्याने ४५ चेंडूत ४२ धावा केल्या.  प्रथमेश बाद झाल्यावर मैदानात आलेल्या चिंतन गडा याने ५ चेंडूत १८ धावा करत टाइम्स ऑफ इंडियाला पुन्हा गेममध्ये आणले.  

अखेरच्या षटकात ६ चेंडूत ७ धावा हव्या होत्या. त्यावेळी धर्मेश बराई याने चौकार खेचत टाइम्स ऑफ इंडियाला विजयच्या उंबरठ्यावर आणले. पण षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डावाला आकार देणार परितोष धावबाद झाला.  हॅमस्ट्रींगमुळे तो खूप त्रस्त असताना त्याने एक बाजू धीराने धरून ठेवली. अखेरच्या तीन चेंडूत दोन धावा हव्या असताना पंकज सावंत आणि ऋषीकेश नरे याने प्रत्येकी एक धाव काढत टाइम्स ऑफ इंडियाला विजय मिळवून दिला. 

हिंदुजा हॉस्पिटल टीम : २० षटकात ७ बाद १२६ (नंदू पाटील ५०, अविनाश जाधव ३८,  राकेश पुतरन ४-१-१९-४  पंकज सावंत ४-१६-२, अनिर्बन चौधरी ४-२०-१  पराभूत विरुद्ध

टाइम्स ऑफ इंडिया : १९.५ षटक ८  बाद १२७ (  परितोष मोहिते ४२, प्रथमेश दुभाषी ३८,  चिंतन गडा १८, राकेश पुतरन ११, चेतन केणी आणि नंदकुमार पाटील यांनी प्रत्येकी दोन विकेट आणि प्रशांत हिरोजी,सनी तांबोळी, जितेंद्र परदेशी यांनी प्रत्येकी एक विकेट ).


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी