IND vs ZIM Weather in Melbourne: टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Indian Cricket Team) आज रविवारी 6 नोव्हेंबरला झिंबाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) भिडणार आहे. आज दुपारी दीड वाजता या सामन्याला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (Melbourne Cricket Ground)सुरुवात होईल. टीम इंडियासाठी हा सामना सेमीफायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सेमीफायनलचं तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने रोहितसेना मैदानात उतरणार आहे. परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, चुरशीच्या सामन्यात झिम्बाब्वे आपली पूर्ण ताकद लावून सामना खेळत असतो. झिम्बाब्वे संघाने पाकिस्तान संघाला 1 धावेसाठी पराभूत केले होतं. त्यामुळे झिम्बाब्वे संघाला हलक्यात घेणे भारतीय संघाला परवडणार नाही. (India vs Zimbabwe today for the semi-final, know the weather in Melbourne and the status of both teams)
अधिक वाचा : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात- उद्धव ठाकरे
दरम्यान या टी20 फॉरमॅटमध्ये दोन्ही संघांनी शेवटचा सामना 2016 मध्ये खेळला होता.त्यानंतर यंदाच्या टी-20 विश्वचषकात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. टीम इंडिया आणि झिंबाब्वे यांच्यात आतापर्यंत टी 20 प्रकारात एकूण 7 वेळा आमना-सामना झाला आहे. यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिला असून भारताचा झिम्बाब्वेविरुद्ध 5-2 असा करिअर रेकॉर्ड आहे.टीम इंडियाने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे.
अधिक वाचा : आज लागणार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल
तर 2 वेळा झिंबाब्वेने भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे आकडेवारी टीम इंडियाच्याच बाजूने आहे. पण तरीही भारतीय संघाला गाफील राहून चालणार नाही कारण हा सामना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे.आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील पहिलाच पराभव आहे. त्यामुळे टीम इंडियाला जर सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर झिंबाब्वे विरुद्धचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान,झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाचं दमदार कामगिरी हे या संघाचे बलस्थान आहे. याशिवाय कर्णधार क्रेग इर्विन, शान विल्यम्स, वेस्ली माधवेरे आणि रायन बर्ले यांच्याकडूनही संघाला चांगल्या योगदानाची अपेक्षा असेल.या विश्वचषकात झिम्बाब्वेने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवले आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेला हलक्यात घेणे टीम इंडियाला परवाडणार नाही.
भारतीय संघाला या मैदनावर खेळण्याचा अनुभव आहे. दोन आठवड्यांपूर्वी यांच मेलबर्नच्या मैदानावर भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर आता झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडिया पुन्हा या मैदानावर उतरणार आहे. परंतु झिम्बाब्वेचा संघ हा पूर्ण सकारात्मक पद्धतीने मैदानात उतरेल. यामुळे हा सामना खूपच चुरशीचा होण्याची शक्यता आहे. या मैदानावरील हवामानाविषयी आपण विचार केला तर, T20विश्वचषक 2022 मध्ये मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानाने पावसामुळे चाहत्यांची निराशा केली आहे.
अधिक वाचा : शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठीच्या सोप्या टिप्स
येथे 5 पैकी 3 सामने पावसात पूर्णपणे वाहून गेले, ज्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. तर एका सामन्यात पावसामुळे षटके कमी करावी लागली. त्यामुळे भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्यातही हवामान हवामानाचा अडथळा येऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्यानुसार मेलबर्नमध्ये 6 नोव्हेंबरला पावसाची केवळ 30 टक्के शक्यता आहे. दुपारनंतर किंवा संध्याकाळनंतर सामन्यादरम्यान आकाश ढगाळ राहू शकते. पण पाऊस होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आणि अर्शदीप सिंग.
क्रेग एर्विन (कॅप्टन), रयान बर्ल, रेजिस चकबवा, तेंदई चटारा , ब्रॅडली इवांस, ल्यूक जोंगवे , क्लाइव मदांडे, वेस्ली मधेवेरे, वेलिंगटन मसाकाद्जा, टोनी मुन्योंगा, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, सिकंदर रजा, मिल्टन शुम्बा आणि सीन विलियम्स.