'दंगल गर्ल' बबिता फोगाटनं वडिलांसोबत केला या' पक्षात प्रवेश 

Babita Phogat: 'दंगल गर्ल' बबिता फोगाट ही आता लवकरच राजकीय आखाड्यात दिसणार आहे. कारण की, बबिताने आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

babita phogat_twiiter
'दंगल गर्ल' बबिता फोगाटनं वडिलांसोबत केला या' पक्षात प्रवेश  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • कुस्तीपटू बबिता फोगाटचा भाजपमध्ये प्रवेश
  • बबिता फोगाटसह वडील महावीर फोगाट यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश
  • सेलिब्रिटींचा भाजपमध्ये जाण्याचा कल वाढला

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने देशात आपली पक्ष संघटना प्रचंड मजबूत केली आहे. यासाठी भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. गेल्या वर्षी भाजपने 'संपर्क फॉर समर्थन' हे अभियान राबवून देशभरातील सेलिब्रिटींना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचं हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील ठरलं होतं. कारण त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक सेलिब्रिटींनी भाजपमध्ये जाणं पसंत केलं होतं. पण निवडणुका संपल्या असल्या तरीही भाजपमध्ये प्रवेश करणं काही अद्यापही संपलेलं नाही. याचंच उदाहरण म्हणजे म्हणजे कुस्तीपटू बबिता फोगाट हिने आज आपल्या वडिलांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

कुस्तीच्या आखाड्यात आजवर अनेकांना चीत करणाऱ्या बबिताने आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ती भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज राजधानी दिल्लीमधील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत बबिता आणि तिचे वडील महावीर फोगाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बबिताने नुकतंच कलम ३७० रद्द केल्यानंतर भाजपला आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर जेव्हा पाकिस्ताने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्याची बातमी समोर आली होती तेव्हा  बबिताने एक भन्नाट ट्वीट केलं होतं. त्यात बबिता असं म्हणाला होती की, 'पंक्चर वाल्याने MRF सोबत व्यापारी संबंध तोडले!' तिचं हे ट्वीट खूपच व्हायरल झालं होतं. अनेकांनी हे ट्वीट रिट्विट देखील केलं होतं. 

 

 

बबिता फोगाट हिने आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्समध्ये दोन सुवर्णपदकं आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे. बबिताने कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. तिच्यासोबतच माजी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं होतं. 

 

 

दिल्लीतील हरियाणा भवनमध्ये बबिता फोगाट आणि तिचे वडील महावीर फोगाट हे आज पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये प्रवेशाची घोषणा केली. बबिता फोगाटसोबत तिचे वडील महावीर फोगाट यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. महावीर फोगाट हे हरियाणामधील बलाली गावचे रहिवासी आहेत. 

दरम्यान, याआधी महावीर फोगाट हे दुष्यंत चौटाला यांचा पक्ष जननायक जनता पार्टी (जेजेपी) चे कार्यकर्ते होते. त्यांना जेजेपीच्या स्पोर्ट्स विंगचे प्रमुख करण्यात आलं होतं. पण आता महावीर फोगाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जेजेपीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.

महावीर फोगाट यांनी आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवून देशासमोर एक मोठं उदाहरणं ठेवलं होतं. सुरुवातीला गीता आणि बबिता या दोन्ही मुलींनी कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देशाचं लक्ष आपल्याकडे वळवून घेतलं होतं. त्यांच्या या प्रवासावर 'दंगल' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ज्यात आमीर खानने महावीर फोगाट यांची भूमिका साकारली होती. हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. या सिनेमामुळे संपूर्ण फोगाट कुटुंबाचा संघर्ष जगापुढे आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
'दंगल गर्ल' बबिता फोगाटनं वडिलांसोबत केला या' पक्षात प्रवेश  Description: Babita Phogat: 'दंगल गर्ल' बबिता फोगाट ही आता लवकरच राजकीय आखाड्यात दिसणार आहे. कारण की, बबिताने आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...