टोकियो ऑलिम्पिक: स्वतःचे मेडल स्वतःच गळ्यात घालून घ्यायचे

कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये एक अनोखा प्रयोग होणार आहे. विजेत्या खेळाडूंना स्वतःचे मेडल (पदक) स्वतःच गळ्यात घालून घ्यावे लागणार आहे.

Tokyo Olympics winners will have to put their medals on necks by themselves
टोकियो ऑलिम्पिक: स्वतःचे मेडल स्वतःच गळ्यात घालून घ्यायचे 

थोडं पण कामाचं

  • टोकियो ऑलिम्पिक: स्वतःचे मेडल स्वतःच गळ्यात घालून घ्यायचे
  • कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून टोकियो ऑलिम्पिकमध्ये अभिनव प्रयोग
  • मेडल तसेच मेडल ठेवायचे ट्रे या सर्वांचे निर्जंतुकीकरण

टोकियो: कोरोना संकटामुळे पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये एक अनोखा प्रयोग होणार आहे. विजेत्या खेळाडूंना स्वतःचे मेडल (पदक) स्वतःच गळ्यात घालून घ्यावे लागणार आहे. एरवी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंच्या गळ्यात मेडल घातले जाते आणि त्या खेळाडूंचा सत्कार केला जातो. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजेत्या खेळाडूंना स्वतःचे मेडल (पदक) स्वतःच गळ्यात घालून घ्यावे लागणार आहे. Tokyo Olympics winners will have to put their medals on necks by themselves

कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून टोकियो ऑलिम्पिकमध्ये अभिनव प्रयोग केला जाणार आहे. या प्रयोगासाठी मेडल एका ट्रे (तबक) मध्ये ठेवले जाईल. विजेते खेळाडू सोशस डिस्टंस राखून उभे राहतील. त्यांच्या नावाची घोषणा होताच खेळाडू समोर एक व्यक्ती ट्रे घेऊन जाईल. यातून स्वतःचे मेडल घेऊन ते स्वतःच गळ्यात घालून घ्यायचे आहे.

याआधी टोकियो ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयापाठोपाठ मेडल संदर्भातला अभिनव निर्णय झाला आहे.

ऑलिम्पिक आयोजन समितीचे कर्मचारी, अधिकारी मेडल तसेच मेडल ठेवायचे ट्रे या सर्वांचे निर्जंतुकीकरण करतील. यानंतर एक व्यक्ती निर्जंतुकीकरण केलेला मास्क आणि हँडग्लोव्हज घालून मेडल ट्रे मध्ये ठेवेल. विजेते खेळाडू सोशस डिस्टंस राखून उभे राहतील. त्यांच्या नावाची घोषणा होताच खेळाडू समोर हँडग्लोव्हज घालून मेडल आणि ट्रे ला स्पर्श करणारी व्यक्ती ट्रे हाती घेऊन खेळाडू समोर सादर करेल. या ट्रे मधून मेडल घेऊन खेळाडू स्वतःच्या हाताने ते मेडल स्वतःच्या गळ्यात घालून घेणार आहे.

संपूर्ण ऑलिम्पिक स्पर्धेत सर्व पुरस्कार सोहळ्यांमध्ये खेळाडूंना एकमेकांना हस्तांदोलन करण्यास तसेच गळाभेट घेण्यास मनाई करण्यात आली आहे. पुरस्कार सोहळ्यांमध्ये उपस्थित सर्व खेळाडू, ऑलिम्पिक आयोजन समितीचे कर्मचारी, अधिकारी आणि इतर व्यक्तींना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टंस राखण्याचे बंधन असेल. तसेच पुरस्कार सोळ्याला निवडक व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. इतरांना सोहळा बघण्यासाठी टीव्ही प्रक्षेपण, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि व्हिडीओ हे पर्याय उपलब्ध असतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी