Five Reasons of Team India Defeat : IND Vs NZ: सर्वोकृष्ट टीम इंडियाला फक्त 8 चौकार आणि 2 षटकार मारता आली, जाणून घ्या पराभवाची ठळक पाच कारणे

Five Reasons of Team India Defeat : टी20 विश्वचषकात (T20 World Cup) न्यूझीलंडकडून (New Zealand) टीम इंडियाला (Team India) लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली.

 find out the top five reasons for the defeat of Team India
टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा पराभूत होण्याची पाच ठळक कारणे   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • शार्दुल ठाकूरला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.
  • सलामीचा फलंदाज केएल राहुलला देखील अपयशी
  • सोधीच्या फिरकीविरुद्धात विराट सेना फलंदाजी करण्यास असक्षम ठरली.

Five Reasons of Team India Defeat : दुबई: टी20 विश्वचषकात (T20 World Cup) न्यूझीलंडकडून (New Zealand) टीम इंडियाला (Team India) लाजिरवाणी हार स्वीकारावी लागली. भारताने दिलेलं 111 धावांचे माफक आव्हान किवी फलंदाजांनी 15 व्या षटकातच पार केलं. पाकिस्तानपाठोपाठ याही सामन्यात भारतीय गोलंदाजी (Indian bowling) निष्प्रभ ठरली. चौथ्या षटकात बुमरानं गप्टिलला माघारी धाडलं. पण त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन (Captain Ken Williamson) आणि सलामीच्या डॅरी मिशेलनं (Dary Mitchell) 72 धावांची भागीदारी साकारली. बुमराच्याच गोलंदाजीवर मिशेल 49 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विल्यमसननं डेवॉन कॉनवेच्या साथीने विजय मिळवला. विल्यमसननं नाबाद राहत 33 धावांची खेळी केली. जगात सर्वोकृष्ट ओळखली जाणारी भारतीय टीम सलग दोनदा पराभूत झाली आहे. पराभूत होण्याची ठळक कारणे पाहिल्यास क्रिकेट चाहत्यांना राग अनावर आणणारी आहेत.

जाणून घेऊन काय आहेत पराभूत होण्याची कारणे   

सलग दुसऱ्यांदा नाणेफेक हरलो : 

या विश्वचषकात नाणेफेक जिंकण खूप महत्त्वाचा ठरत आहे. आत्तापर्यंत पहिल्यादा गोलंदाजी करणारा संघ जिंकलेला पाहायला मिळाला आहे. कालच्या सामन्यातही न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात विराट कोहली सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमवावा लागलाय. दुबईमध्ये दुसऱ्या डावात दव फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावतोय ज्यामुळे फलंदाजी करणे सोपे होते.

फलंदाजीत फेल ठरले इशान किशन आणि शार्दुल ठाकूर : 

भारताने या सामन्यात दुखापतग्रस्त सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशनला संधी देत रोहित शर्माच्या जागी त्याला सलामीला पाठवण्यात आले. पण ट्रेंट बोल्टने सामन्याच्या तिसर्‍या षटकाच्या 5व्या चेंडूवर इशान किशनला वैयक्तिक 4 धावांवर माघारी धाडले. तर दुसरीकडे भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. त्यानेही निराशा केली. शार्दुल ठाकूरला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.

राहुल-रोहित-कोहलीची तिकडी अपयशी : 

सलामीचा फलंदाज केएल राहुलला देखील अद्याप चांगला खेळ करता आलेला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो अवघ्या 18 धावा करून बाद झाला. तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत अ‍ॅडम मिल्नेला एक चौकार आणि एक षटकार ठोकत मोठी खेळी खेळण्याचे संकेत दिले. पण ईश सोधीच्या शॉर्ट पिच बॉलवर झेलबाद झाला. तर पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणारा कर्णधार विराट कोहली 3 विकेट पडल्यानंतर दडपणाखाली आला. कोहलीने इश सोधीच्या चेंडूवर मिडविकेटवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण तो झेलबाद झाला. 

डॉट बॉल :

दमदार फलंदाजीसाठी ओळखणारी टीम इंडियाच्या फलंदाजांनी 54 डॉट बॉल खेळले. संपूर्ण सामन्यात भारत फक्त 8 चौकार आणि 2 षटकार मारण्यात यशस्वी ठरला. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर भारतीय फलंदाजांनी सरळ 17व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला.

ईश सोधी फिरकीपुढे फलंदाजी अपयशी :

भारतीय संघ हा टी20 चषक विजयाचा दावेदार समजाला जाणारा संघ होता. परंतु सलग दोन पराभव पाहता टीम इंडिया उपांत्य फेरी तरी गाठू शकेल का याची शंका वाटू लागली आहे. टीम इंडिया फलंदाजीसाठी उत्कृष्ट मानली जाते. परंतु ईश सोधीच्या फिरकीविरुद्धात भारतीय खेळाडूंना धावाच करता आल्या नाहीत. 

ईश सोधी आणि मिचेल सॅटनर या जोडीने भारतीय फलंदाजांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. दोघांनी 8 षटके टाकली आणि फक्त 31 धावा दिल्या. या जोडीने 2 विकेट्सही घेतल्या. भारतीय फलंदाजांकडे सोढी आणि सेटनरचा कसा सामना करायचा याचा कोणताही विचार नव्हता. त्यामुळे भारतीय फलंदाजांना किवींच्या फिरकीपटूंविरुद्ध मोठ्या धावा करता आल्या नाहीत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी