IPL:आज आयपीएलसाठी मोठा दिवस, मिळणार दोन नव्या टीम्स

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 25, 2021 | 23:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज आयपीएलला २ नवे संघ मिळणार आहे ज्यामुळे आयपीएलची मजा आणखी वाढणार आहे. दोन नव्या टीम्स सामील झाल्याने अधिक भारतीय खेळाडूंना खेळण्याची संधी मिळू शकते. 

ipl
आज आयपीएलसाठी मोठा दिवस, मिळणार दोन नव्या टीम्स 
थोडं पण कामाचं
  • आज आयपीएलमध्ये सामील होणार दोन नव्या टीम्स
  • आयपीएल २०२२मध्ये १० संघ खेळणार
  • भारतीय खेळाडूंना मिळणार अधिक संधी

दुबई: आतापर्यंत आपण आयपीएलमध्ये ८ संघांना खेळताना पाहिले आहे मात्र २०२२मध्ये सर्व भारतीय आयपीएलमध्ये १० संघांना खेळताना पाहणार आहेत. यासाठीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. जेव्हा आयपीएलमध्ये १० संघ खेळतील तेव्हा जगातील या सगळ्यात मोठ्या टी-२० क्रिकेट लीगची मजा आणखीनच वाढणार आहे. आयपीएलची जगभरात क्रेझ आहे. जेव्हा आयपीएलमध्ये १० संघ असतील तेव्हा अधिक भारतीय खेळाडूंना संधी मिळेल. 

संघ खरेदीसाठी हे ग्रुप पुढे

आयपीएल २०२२मध्ये आठ संघांशिवाय दोन नवे संघ सामील होत आहेत. यासाठी बोलीची प्रक्रिया आजपासून दुबईत सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाली आहे. यात २० पेक्षा जास्त कंपन्यांनी टेंडर टाकले आहे. फायनल बोलीसाठी पाच ते सहा कंपन्यांना निवडले जाणार आहे. नवीन संघ खरेदी करण्याच्या स्पर्धेत अडाणी ग्रुप, गोएंका ग्रुप आणि सीव्हीसी वेंचर्स आहेत. परदेशी कंपन्यांनीही आयपीएलमधील संघ खरेदीसाठी टेंडर टाकले आहे. 

लखनऊ आणि अहमदाबाद सगळ्यात पुढे

आयपीएलच्या दोन नव्या संघांसाठी लखनऊ आणि अहमदाबाद ही नावे पहिल्यापासूनच चर्चेत होती. याशिवाय गुवाहाटी, रांची, कट्टक आणि धरमशाला यांचाही दावेदारांमध्ये समावेश आहे. बातमी आहे की या सहापैकी दोन नवे संघ आयपीएलमध्ये सामील होऊ शकतात. नव्या संघांसाठी जे होम ग्राऊंड आहेत त्यांच्यात अहमदाबाद, लखनऊ आणि पुणे यांचाही समावेश आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनऊच्या इकाना स्टेडियमला फ्रेंचायजींची पसंती आहे. कारण या स्टेडियममध्ये अधिक लोक बसू शकतात. 

बीसीसीआय पुढील वर्षी करणार मेगा लिलाव

पुढील वर्षी बीसीसीआय मेगा लिलाव करणार आहे. यात तीन रिटेंशन असणार आहे आणि दोन राईट टू मॅच कार्ड खेळाडू असणार आहेत. इतर सर्व खेळाडूंना लिलावात उतरवले जाणार आहे. जर दोन फ्रेंचायजींना सामील केले जात असेल तर मग मेगा लिलाव होईल. बोर्डाने दोन संघ खरेदीसाठी लिलाव आज ठेवला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी