क्रिकेट जगताला धक्का, वीज कोसळून दोन युवा क्रिकेटर्सचा मृत्यू 

Lightning in Bangladesh: बांगलादेशात दरवर्षी  एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान मान्सून सीझनमध्ये अनेक वेळा वीज पडून अनेक लोकांचे प्राण जातात, यंदा बांगलादेशात वीज पडून ३५० जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. 

two teenage cricketers killed by lightning in bangladesh
क्रिकेट जगताला धक्का, वीज कोसळून दोन युवा क्रिकेटर्सचा मृत्यू  

थोडं पण कामाचं

  • बांग्लादेशात दोन युवा क्रिकेटपटूंचा गुरूवारी वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. मोहम्मद नदीम आणि मिजानूर रहमान असे या दोन क्रिकेटपट्टूंची नावे आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • हे दोन्ही क्रिकेटर्स ढाक्याच्या बाहेर गाजामध्ये स्टेडियममध्ये फुटबॉल खेळत होते.
  • काही क्रिकेटपट्टूंनी या दरम्यान फुटबॉल खेळणे सुरू केले होते. पण काळाने घाला घातला आणि त्यांच्यावर वीज कोसळली. 

ढाका :  बांग्लादेशात दोन युवा क्रिकेटपटूंचा गुरूवारी वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला आहे. मोहम्मद नदीम आणि मिजानूर रहमान असे या दोन क्रिकेटपट्टूंची नावे आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोन्ही क्रिकेटर्स ढाक्याच्या बाहेर गाजामध्ये स्टेडियममध्ये फुटबॉल खेळत होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. पावसामुळे सध्या क्रिकेटची ट्रेनिंग थांबली आहे. त्यामुळे काही क्रिकेटपट्टूंनी या दरम्यान फुटबॉल खेळणे सुरू केले होते. पण काळाने घाला घातला आणि त्यांच्यावर वीज कोसळली. 

बांगलादेशात दरवर्षी  एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान मान्सून सीझनमध्ये अनेक वेळा वीज पडून अनेक लोकांचे प्राण जातात, यंदा बांगलादेशात वीज पडून ३५० जणांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. 

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी मोहम्मद पलाश याने एएफपीशी बोलताना सांगितले की, अचानक वीज कोसळली आणि मी पाहिले की तीन मुलं मैदानावर पडले. इतर खेळाडू त्यांच्याजवळ गेले त्यांना उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण हॉस्पिटलमध्ये या खेळाडूंना मृत घोषीत केले. शहीद तजुद्दीन मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी १६ वर्षीय या तरूण क्रिकेटपट्टूंची मृत्यू झाल्याचे जाहीर केले. 

क्रिकेट कोच अनवर हुसैन लिटन यांनी सांगितले की मोहम्मद नदीम आणि मिजानूर रहमान यांची टुर्नामेंटमध्ये जागा पक्की होती. ते ट्रायल करत होते. टुर्नामेंटमध्ये राष्ट्रीय स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले जाते. 

बांगलादेशात अधिकाऱ्यांनी वीज कोसळल्यास नैसर्गिक आपत्ती घोषीत केले आहे. २०१६ मध्ये एका दिवसात ८२ जणांचा मृत्यू झाला होता. बांगलादेशमध्ये वीज पडून कमीत कमी ३५० जणांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी