Customs department seized Two watches : हौस पडली महागात; मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याकडून 5 कोटी रुपयांचे दोन घड्याळ जप्त

Customs department seized Two watches : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) स्टार अष्टपैलू(All-rounder) खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने आपल्या कारकिर्दीत फार कमी वेळात यश मिळवले. आपल्या तडाखेबाज खेळाबरोबर हार्दिक पांड्या लक्झरी लाइफ (Luxury life) जगण्यासाठीही ओळखला जातो.

Two watches worth Rs 5 crore seized from Hardik Pandya at Mumbai airport
हार्दिक पांड्याकडून 5 कोटी रुपयांचे दोन घड्याळ जप्त   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सीमा शुल्क विभागाने 5 कोटी रुपयांचे दोन घड्याळ जप्त केली आहेत.
  • हार्दिकला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे.
  • काही महिन्यांपूर्वीच हार्दिकने Patek Philippe Nautilus Platinum 5711 चे एक घड्याळ खरेदी केले होते.

Customs department seized Two watches :  मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) स्टार अष्टपैलू(All-rounder) खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya)ने आपल्या कारकिर्दीत फार कमी वेळात यश मिळवले. आपल्या तडाखेबाज खेळाबरोबर हार्दिक पांड्या लक्झरी लाइफ (Luxury life) जगण्यासाठीही ओळखला जातो. या दोन्ही गोष्टींमुळे तो नेहमी चर्चेत असतो. परंतु सध्या हार्दिकची चर्चा सीमा शुल्क विभागाने (customs department) त्याच्यावर केलेल्या कारवाईमुळे होत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हार्दिकवर संकटे येत आहेत. टी-20 विश्वचषकानंतर निवडकर्त्यांनी त्याला टीम इंडियातून वगळले. आता असे वृत्त आहे की हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर यूएईहून मुंबईला परतताना सीमा शुल्क विभागाने त्याची दोन घड्याळे जप्त केली आहेत. हार्दिकच्या या 2 घड्याळांनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सीमा शुल्क विभागाने त्यांच्याकडील 5 कोटी रुपयांचे दोन घड्याळ जप्त केली आहेत. हार्दिकच्या घड्याळाची किंमत ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

घड्याळं का जप्त करण्यात आले?

हार्दिककडे या घड्याळांचे बिल नव्हते आणि त्याने घड्याळे जाहीरही केली नाहीत. यानंतर सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर हार्दिक पांड्याची ५ कोटींची दोन घड्याळे जप्त केली आहेत. दरम्यान, हार्दिकला महागड्या घड्याळांची खूप आवड आहे. काही महिन्यांपूर्वीच हार्दिकने Patek Philippe Nautilus Platinum 5711 चे एक घड्याळ खरेदी केले, ज्याची किंमत 5 कोटींहून अधिक आहे.

टी-२० विश्वचषकात पांड्या सपशेल अपयशी ठरला

आत्ताच संपलेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरला आहे. पाच सामन्याच्या तीन इनिंगमध्ये त्याने फक्त 69 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी हार्दिक पांड्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. व्यंकटेश अय्यरने IPL 2021 च्या 10 सामन्यांमध्ये 128.47 च्या स्ट्राइक रेटने 370 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे.  उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून टी-२० मध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. व्यंकटेश अय्यरने एकूण 48 टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये 24 बळी घेतले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी