U-19 World Cup 2022 :पाचव्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी भारताची टीम सज्ज, U-19च्या संघाची घोषणा

Team India Announcement : U-19 World Cup मध्ये भारतीय संघ सर्वाधिक यशस्वी संघ आहे. तब्बल 4 वेळा अंडर 19 चा विश्वचषक (World Cup) विजेता असलेला भारताचा संघ आता परत आगामी 2022 च्या अंडर 19 विश्वचषक आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे.

 U-19 World Cup 2022 Team India
भारताच्या U-19 टीमची घोषणा, पहिला सामना होणार द.आफ्रिकेशी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारताने तब्बल 4 वेळा अंडर 19 मध्ये विजेतेपद पटकावलं आहे.
  • अंडर19 च्या संघाचे नेतृत्व दिल्लीचा यश धुल करणार आहे.
  • भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी 15 जानेवारीला होणार आहे.

U-19 World Cup 2022, Team India Announcement : नवी दिल्ली :  U-19 World Cup मध्ये भारतीय संघ सर्वाधिक यशस्वी संघ आहे. तब्बल 4 वेळा अंडर 19 चा विश्वचषक (World Cup) विजेता असलेला भारताचा संघ आता परत आगामी 2022 च्या अंडर 19 विश्वचषक आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BBCI) नुकतेच त्याविषयी ट्विट करत भारतीय संघ (Indian Team) जाहीर केला आहे. वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) अंडर-19 विश्वचषक 2022 खेळला जाणार असून १४ जानेवारीला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर निवड समितीने यश धुलच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. 

दरम्यान अंडर-19 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 14 व्या आवृत्तीत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. त्यात 48 सामने खेळवले जाणार आहेत. यावेळीही भारतीय संघ आपल्या नावावर अंडर19चं विश्वचषक करण्यास उत्सुक आहे. सतरा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून याची धूरा दिल्लीत राहणाऱ्या यश धुल याकडे सोपवण्यात आली आहे. तर एसके रशीदला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. बीसीसीआयने रविवारी भारतीय संघाची घोषणा केली. दिल्लीचा यश धुल टीम इंडियाची धुरा सांभाळेल.

याआधी दिल्लीच्या विराट कोहली आणि  उन्मुक्त चंद यांनीही अंडर-19 विश्वचषकात भारताचं नेतृत्व केले आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने विजेतेपद पटकावलं होतं. हा वारसा यश धुल पुढे चालवणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. संपूर्ण भारतीय संघ सध्या  बंगळुरू इथल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव शिबिरात सहभागी होत आहे. विश्वचषकापूर्वी संघ यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घेणार आहे.दरम्यान,  2018 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचे विजेतेपद जिंकलं होते. त्यानंतर 2020 मध्ये प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली होती, पण बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 

U-19 World Cup 2022 साठी भारतीय संघ

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात 17 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाच खेळाडूंचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. एसके रशीद संघाचा उपकर्णधार असेल.

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधु, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासु वत्स, विकी ओस्टवाल, रविकुमार, गर्व सांगवान.
राखीव खेळाडू - रिषित रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, पीएम सिंह राठौड

भारत ग्रुप बी मध्ये

अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झालेअसून चार गट तयार करण्यात आले आहेत. भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आले आहे. भारताशिवाय या गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडा या संघाचा समावेश आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगच्या टप्प्यात खेळतील. भारताचा पहिला सामना 15 जानेवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर दुसरा सामना 19 जानेवारीला आयर्लंडशी आणि शेवटचा साखळी सामना 22 जानेवारीला युगांडासोबत आहे.
गट अ - बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती
गट क - अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, झिम्बाब्वे 
गट ड -ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज.

पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज

अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. 1988 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने तब्बल 4 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. 2000 मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पहिल्यांदा यश मिळाले. यानंतर 2008 मध्ये विराट कोहली, 2012 मध्ये उन्मुक्त चंद आणि 2018 मध्ये पृथ्वी शॉने देशाला विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ 2016 आणि 2020 मध्ये उपविजेता ठरला होता. आता पाचव्या विजेतेपदासाठी टीम इंडिया पुन्हा सज्ज झाली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी