U-19 World Cup: टीम इंडियाचे खेळाडू दमदार, दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव करत विजयी सुरुवात

U-19 World Cup  India Beat to SA :2022 च्या U-19 वर्ल्डकपची सुरुवात भारताने विजयाने केली आहे. गयाना (Guyana) येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर  (Providence Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यांमध्ये (Match) टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 45 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करत भारतीय संघाला प्रथम फलंदाज करण्याची संधी दिली.

India Beat South Africa
दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव करत भारताची विजयी सुरुवात   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पहिल्या सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केलं.
  • दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.4 षटकांमध्ये फक्त 187 धावा करत गारद झाला.
  • भारताचे सहा खेळाडूंनी 10 च्या संख्येखालीच धावा केल्या.

 U-19 World Cup India Win:   नवी दिल्ली : 2022 च्या U-19 वर्ल्डकपची सुरुवात भारताने विजयाने केली आहे. गयाना (Guyana) येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर  (Providence Stadium) खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यांमध्ये (Match) टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 45 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करत भारतीय संघाला प्रथम फलंदाज करण्याची संधी दिली. भारताने टीम इंडिया 46.5 ओव्हरमध्ये सर्व बाद होत 232 धावा केल्या. 

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा खेळी कमकुवत ठरली. दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.4 षटकांमध्ये फक्त 187 धावा करत गारद झाला. भारतीय अंडर19 च्या संघाचा कर्णधार यश धुल आणि स्पिनर विकी ओस्तवाल हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. धुलने 82 धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर विकीने आपल्या फिरकीच्या जादुने दक्षिण आफ्रिकेचे पाच गडी बाद केले. यासाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले.

232 रन करुन टीम इंडिया ऑलआऊट

नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 11 धावांवर टीम इंडियाचे सलामीवीर तंबूत परतले. यानंतर शेख रशीद आणि कॅप्टन यश धुल यांनी धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. रशीद 54 चेंडूंमध्ये 31 धावा करुन बाद झाला. त्यानंतर यशने निशांत सिंधू, राज बावा आणि कौशल तांबे यांच्यासोबत छोट्या पण महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या आणि संघाचा खेळ सांभाळला. कर्णधार यश धाव बाद झाल्यानंतर संघाने 46.5 षटकात 232 धाावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला 233 धावांचे आव्हान दिले. 

भारताकडून कर्णधार यश धुलने सर्वाधिक 82 धावा केल्या. त्याचवेळी निशांत सिंधू 27, राज बावा 13 धावा आणि कौशल तांबे 35 धावा करू शकले. टीम इंडियाच्या 6 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यात अंगकृष्ण रघुवंशी (5), हरनूर सिंग (1), दिनेश बाना (7), विकी ओस्तवाल (9), राजवर्धन हंगरगेकर (0) आणि रवी कुमार (नाबाद 0) यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टने तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय अफिवे नियांडा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी प्रत्येकी 2- 2 विकेट्स घेतले. लियाम एल्डर आणि मिकी कोपलँडला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी