u19 Womens T20 World Cup : इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत भारताने जिंकला विश्वचषक

u19 Womens T20: भारताने विश्वचषक जिंकला आणि संपूर्ण क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडवर मोठा विजय साकारला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडचा फक्त 68 धावांमध्ये खुर्दा उडवला होता.

india Won the World Cup with victory over England
इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत विश्वचषक जिंकला  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या.
  • भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडचा (England) फक्त 68 धावांमध्ये खुर्दा उडवला
  • भारताची कर्णधार शेफाली वर्मा ही तिसऱ्या षटकात 15 धावांवर बाद झाली.

india Won the World Cup : केप टाऊन :  भारताने (India)विश्वचषक (World Cup) जिंकला आणि संपूर्ण क्रिकेट जगताला आपली दखल घेण्यास भाग पाडले. भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडवर मोठा विजय साकारला. भारताने प्रथम गोलंदाजी करताना इंग्लंडचा (England) फक्त 68 धावांमध्ये खुर्दा उडवला होता. या आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत भारताने विश्वचषक जिंकला. (u19 Womens T20 World Cup :india Won the World Cup with a resounding victory over England)

नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी खेळी करत भारतीय महिलांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या खेळाडूंना तंबूत धाडणं सुरु ठेवलं. भारताने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हिपला शून्यावर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर एकामागून एक खेळाडू बाद होत राहीले. 17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ 68 धावांवर बाद झाला.

अधिक वाचा  : महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त इमेजद्वारे करा अभिवादन

भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या. अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या.  दरम्यान इंग्लंडच्या महिला संघाने भारतासाठी 69 धावांचे आव्हान हे फार छोटे वाटत असले तरी त्यांना सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. 

अधिक वाचा  : असं करा महात्मा गांधींजी यांच्या पुण्यतिथीचं भाषण

भारताची कर्णधार शेफाली वर्मा ही तिसऱ्या षटकात 15 धावांवर बाद झाली. भारतासाठी हा मोठा धक्का होता. कारण शेफाली ही अनुभवी खेळाडू होती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा तिच्याकडे चांगला अनुभव होता. त्यामुळे भारताला तिसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. त्यानंतर भारताला स्वेता सेहरावतच्या रुपात दुसरा धक्का बसला, स्वेताला यावेळी पाच धावा करता आल्या. भारताने पाचव्या षटकात आपेल दोन्ही ओपनर गमावले होते आणि त्यांची धावसंख्या 2 बाद 20 अशी झाली होती. पण त्यानंतर सौम्या तिवारीने भारताचा डाव सावरला. यावेळी सौम्याला त्रिशाने चांगली साथ दिली.

अधिक वाचा  : महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा

तीन विकेट्स गमावत लक्ष्य केलं साध्य

120 चेंडूत 69 धावाचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी स्फोटक खेळी सुरू केली. एक चौकार आणि एक षटकार ठोकून कॅप्टन शेफाली 15 धावांवर तंबूत परतली. सेमीफायनलमध्ये कमाल कामगिरी करणारी श्वेताही 5 धावा करुन बाद झाली. पण नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा 24 धावा करुन बाद झाली. पण तोवर भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. सौम्याच्या नाबाद 24 धावांच्या जोरावर भारतानं 14 षटकात 69 धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी