U19 विश्वचषक 2022: हरनूरचे धडाकेबाज शतक, टीम इंडियाने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केला पराभव

U19 World Cup 2022: भारतीय अंडर-19 संघाने वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव करून आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली.

u19 world cup 2022 india beat australia by 9 wickets in practice match with help of harnoor singh century cricket news in marathi
U19 World Cup 2022, IND vs AUS, U19 Cricket, India U19 Cricket team, Harnoor Singh, Harnoor singh century, Yash Dull, U19 विश्वचषक 2022, IND vs AUS, U19 क्रिकेट, भारत U19 क्रिकेट संघ, हरनूर सिंग, हरनूर सिंग शतक, यश दुल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या शतकी खेळीवर हरनूर सिंगने पाणी फेरले
  • भारताने केवळ 1 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले
  • हरनूरने 100 आणि कर्णधार यश धुलने केल्या 50 धावा.

India Win ।  प्रोव्हिडन्स (गयाना) : सलामीवीर हरनूर सिंगच्या नाबाद १०० धावांच्या जोरावर भारताने अंडर-१९ विश्वचषकापूर्वी झालेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कर्णधार कूपर कॉनोलीच्या 117 धावांच्या जोरावर 49.2 षटकात 268 धावा केल्या. कॉनोलीने आपल्या खेळीत 14 चौकार आणि चार षटकार मारले.

हरनूरने 16 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. त्याला शेख रशीदची चांगली साथ लाभली ज्याने ७२ धावांची खेळी केली. हे दोन्ही खेळाडू रिटायर्ड हर्ट  होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले आणि त्यानंतर कर्णधार यश धुळने (नाबाद 50) संघाला 15 चेंडू राखून लक्ष्य गाठले.

Also Read : ​शेवटची कसोटी...शेवटचा बॉल आणि शेवटची विकेट...केले सेलिब्रेशन

या स्पर्धेची सुरुवात शुक्रवारी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शनिवारी होणार आहे. बांगलादेश, इंग्लंड आणि पाकिस्ताननेही इतर सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवले. बांगलादेशने डकवर्थ लुईस पद्धतीने झिम्बाब्वेचा १५५ धावांनी पराभव केला. अन्य एका सामन्यात इंग्लंडने यूएईवर दोन गडी राखून विजय मिळवला तर पाकिस्तानने कॅनडाचा आठ गडी राखून पराभव केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी