ICC U19 World Cup 2022 | नवी दिल्ली : जानेवारी ९ पासून अंडर-१९ विश्वचषकाच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. रविवारी भारतीय संघ आपला पहिला सराव सामना वेस्टइंडीजविरूध्द खेळेल. तर ११ जानेवारीला भारताचा दुसरा सराव सामना ऑस्ट्रेलियाविरूध्द (Australia) होणार आहे. दरम्यान या विश्वचषकात बहुचर्चित भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामना होणार का याची क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अंडर-१९ विश्वचषक २०२२ चे आयोजन वेस्टइंडीजमध्ये केले जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्यांदाच अंडर-१९ विश्वचषकाचे यजमानपद वेस्टइंडीजकडे असणार आहे.
ही टुर्नामेंट १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. यामध्ये १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. फायनल सहित ४८ सामन्यांचे आयोजन केले जाईल. भारतीय संघ सराव सामन्यानंतर आपल्या अभियानाची सुरूवात १५ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या सामन्यातून करेल. भारताचा ग्रुप बी मध्ये समावेश आहे. ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिकेव्यतिरिक्त आयर्लंड आणि युगांडाचे संघ आहेत. ((U19 World Cup 2022 Will the India vs Pakistan or not match Know the full schedule of world cup).
न्यूझीलंड यावेळीच्या अंडर-१९ विश्वचषकात सहभागी होणार नाही, कारण त्यांच्या परतल्यानंतर संघाला अनिवार्य क्वारंटाईनचे नियम पाळावे लागतील, त्यामुळेच न्यूझीलंडचा संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही. त्यांच्या जागेवर स्कॉटलंडचा संघ खेळणार आहे. स्कॉटलंडचा संघ ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्टइंडीजसोबत आहे.
ग्रुप ए - बांगलादेश, इंग्लंड, कनाडा, संयुक्त अरब अमिरात,
ग्रुप बी - भारत, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका, युगांडा,
ग्रुप सी - अफगाणिस्तान, पाकिस्तान, पापुआ न्यू गिनी, जिम्बाब्वे
ग्रुप डी - ऑस्ट्रेलिया, स्कॉटलंड, श्रीलंका, वेस्टइंडीज,
भारतीय संघ अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. २०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषकावर कब्जा केला होता. यानंतर २०१६ आणि २०२० मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेच्या मागील टुर्नामेंटमध्ये भारतीय संघ उपविजेता ठरला आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आगामी विश्वचषकात आमनेसामने येणार नाहीत. कारण दोन्ही संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. मात्र हे दोन संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येऊ शकतात. यासाठी दोन्ही संघांना आपापल्या ग्रुपमध्ये क्रमांक १ किंवा क्रमांक २ रहावे लागेल.
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगकृष्ण रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (विकेटकिपर), आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव प्रकाश, कौशल तांबे, आरएस हुंगरेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.