U19 World Cup : भारतात जन्मलेला निवेथान राधाकृष्णन चक्क दोन्ही हातांनी करतोय गोलंदाजी; पाहा व्हिडिओ

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 15, 2022 | 18:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nivethan Radhakrishnan | सध्या वेस्ट इंडिजमध्ये अंडर-१९ विश्वचषकाचा थरार सुरू आहे. नुकत्याच एक दिवसापूर्वी या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. दरम्यान स्पर्धेतील पहिला सामना यजमान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पार पडला. पहिल्याच सामन्यात यजमान संघ चांगली सुरूवात करू शकला नाही.

U19 World Cup Indian-born Nivethan Radhakrishnan bowls with both hands while playing for Australia Watch the video
भारतीय वंशाचा खेळाडू दोन्ही हातांनी गोलंदाजी करतोय   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतीय वंशाचा निवेथान राधाकृष्णन दोन्ही हातांनी गोलंदाजी करतोय.
  • निवेथान राधाकृष्णन अंडर-१९ ऑस्ट्रेलियाच्या संघाचा हिस्सा आहे.
  • राधाकृष्णन हा आयपीएपलध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी राखीव गोलंदाज आहे.

Nivethan Radhakrishnan | नवी दिल्ली : सध्या वेस्ट इंडिजमध्ये अंडर-१९ विश्वचषकाचा (Under-19 World Cup) थरार सुरू आहे. नुकत्याच एक दिवसापूर्वी या स्पर्धेला सुरूवात झाली आहे. दरम्यान स्पर्धेतील पहिला सामना यजमान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) यांच्यामध्ये पार पडला. पहिल्याच सामन्यात यजमान संघ चांगली सुरूवात करू शकला नाही. पहिल्या डावात संघ ४०.१ षटकातच केवळ १६९ धावांवर गारद झाला. लक्षणीय बाब म्हणजे संघातील ७ खेळाडू १० चा देखील आकडा पार करू शकले नाहीत. बदल्यात कांगारूच्या संघाने यजमान संघाला पहिल्याच सामन्यात ६ बळी राखून पराभूत केले. मात्र सामन्यातील आकर्षण हे राहिले की फिरकीपटू गोलंदाज निवेथान राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) ज्याने एकाच षटकात ऑफ-स्पिन आणि दोन्ही हातांनी फिरकी गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. (U19 World Cup Indian-born Nivethan Radhakrishnan bowls with both hands while playing for Australia Watch the video). 

दरम्यान, मूळ भारतीय वंशाचा असलेल्या निवेथान राधाकृष्णनने ऑफ-स्पिन आणि दोन्ही हातांनी फिरकी गोलंदाजी करत वेस्ट इंडिजविरुद्ध सामन्यात बळी देखील पटकावले. त्याने १० षटकांत ४८ धावा देऊन ३ बळी घेतले. तर वेस्टइंडिज कडून कर्णधार अकिम औगुस्तेने ६७ चेंडूत ५७ धावांची साजेशी खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त विकेटकिपर रिवाल्डो क्लार्कने ४२ चेंडूत ३७ धावा करून चौथ्या बळीसाठी ९५ धावांची भागीदारी नोंदवली. तर नवव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या मॅकेनी क्लार्बने ३५ चेंडूत २९ धावा करून वेस्टइंडिजच्या धावसंख्येला १६९ पर्यंत पोहचवले. टॉम विटनी आणि कूपर कॉनॉलनेही प्रत्येकी तीन बळी घेतले.

वडील देखील होते क्रिकेटर 

२०१९ मध्ये राधाकृष्णन पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या १६ वर्षाखालील संघाकडून खेळला. राधाकृष्णन हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी राखीव गोलंदाज आहे. २०१३ मध्ये त्यांचे कुटुंब तामिळनाडूहून सिडनीला गेले. राधाकृष्णनचे वडील अन्बू सेल्वन यांनी तामिळनाडूसाठी ज्युनियर स्तरावर क्रिकेट खेळले आहे. सिडनीला गेल्यानंतर राधाकृष्णनने न्यू साउथ वेल्सचे प्रतिनिधित्व देखील केले. दरम्यान भारतीय संघ देखील टी-२० विश्वचषकात प्रवेश करत आहे, पण तो ऑस्ट्रेलियाच्या गटात नाही. पण भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ उपांत्यफेरीत आमनेसामने येऊ शकतात. 

वयाच्या ६ व्या वर्षापासून करतोय गोलंदाजी 

जेव्हा तो ६ वर्षांचा होता तेव्हा तो डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करत असे. नंतर त्याने ऑफ स्पिन देखील करण्याचा प्रयत्न केला. गरज भासल्यास तो उजव्या हाताने धिम्या गतीने वेगवान गोलंदाजीही करू शकतो. वयाच्या ८ व्या वर्षी त्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या निम्न विभागीय लीगमध्ये हॅटट्रिक घेतली होती. दोन वर्षांनंतर तो सिडनीला गेला आणि तेथे न्यू साउथ वेल्स ज्युनियरसाठी सलामी खेळी करताना त्याने नाबाद १९३ धावांची खेळी खेळली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी