...तर टी २० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार!

कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर २०२१चा टी २० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

UAE likely to host T20 World Cup, BCCI official confirms
कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर २०२१चा टी २० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार 

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर २०२१चा टी २० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार
  • २०२० मध्ये कोरोना संकटामुळे आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब आमिराती येथे झाली होती
  • कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर २०२१चा टी २० वर्ल्ड संयुक्त अरब आमिराती येथे होणार

मुंबईः कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर २०२१चा टी २० वर्ल्ड कप भारताबाहेर होणार, अशी माहिती बीसीसीआयने दिली. याआधी २०२० मध्ये कोरोना संकटामुळे आयपीएल स्पर्धा संयुक्त अरब आमिराती येथे खेळवण्यात आली. याच पद्धतीने कोरोना संकट नियंत्रणात आले नाही तर २०२१चा टी २० वर्ल्ड संयुक्त अरब आमिराती येथे खेळवण्यात येईल; असे बीसीसीआयने सांगितले. UAE likely to host T20 World Cup, BCCI official confirms

क्विंटन डी कॉकची कमाल, मुंबईचा विजय

आयसीसीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १८ ऑक्टोबर १५ नोव्हेंबर या कालावधीत भारतात २०२१चा टी २० वर्ल्ड कप होणार आहे. पण कोरोना संकट वाढले तर ही स्पर्धा संयुक्त अरब आमिराती येथे खेळवण्यासाठी बीसीसीआय नियोजन करत आहे. बीसीसीआयच्या क्रीडा विकास विभागाच्या धीरज मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. 

टी २० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने विदेशी खेळाडू येतील. या परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणावर पसू नये म्हणून बीसीसीआयने आवश्यकत भासल्यास स्पर्धेची मैदाने बदलण्याची तयारी केली आहे. कोरोना संकट नियंत्रणात आले तर भारतातच टी २० वर्ल्ड कप होणार आहे. संयुक्त अरब आमिरातीचा पर्याय कोरोना संकट वाढले तरच अंमलात आणणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी