Umran Malik : IPLनंतर आफ्रिकेत कमाल दाखवणार काश्मिरी फळ विक्रेत्याचा मुलगा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 10, 2021 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Umran Malik Selected for SA tour : जम्मू-काश्मीरचा युवा गोलंदाज उमरान मलिक २३ नोव्हेंबरपासून सुरू होत असेलल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात आहे. त्याला भारत ए संघाता सामील करण्यात आले आहे. 

umran malik
IPLनंतर आफ्रिकेत कमाल दाखवणार काश्मिरी फळ विक्रेत्याचा मुलगा 
थोडं पण कामाचं
  • २३ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार उमरान
  • दौऱ्यावर तीन चार दिवसीय सामने ब्लोमफोंटेनमध्ये खेळवले जाणार

Umran Malik Selected for SA tour : मुंबई: जम्मू-काश्मीरचा(jammu-kashmir) युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक(umran malik) २३ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर(south africa tour) जात आहे. त्याला भारत ए(india a) संघात सामील करण्यात आले आहे. याचे नेतृत्व गुजरातचा फलंगाज प्रियांक पांचाळ करणार आहे. दौऱ्यावर तीन चारदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. तीनही सामने ब्लोमफोंटेनमध्ये होणार आहेत. (umran mailk will be playing in south africa tour for India A)

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज २१ वर्षीय उमरानने आपल्या करिअरमध्ये केवळ एक लिस्ट ए मॅच आणि आठ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने अद्याप लाल बॉलने मॅच खेळलेली नाही. या खेळाडूने नुकत्याच यूएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलदरम्यान आपल्या वेगवान गतीच्या बॉलने साऱ्यांना प्रभावित केले होते. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायजर्स हैदराबादडून खेळताना १५२.९५ किमी प्रति तास वेगाने स्पर्धेतील सर्वात वेगवान बॉल फेकला होता. 

जम्मूच्या गुर्जर नगर क्षेत्रात फळ विक्रेत्याचा मुलगा उमरानने रेल्वेविरुद्ध टी-२०मध्ये पदार्पण करताना २४ धावा देत तीन विकेट मिळवल्या होत्या आणि भारताचा माजी क्रिकेटर कर्ण शर्मालाही बाद केले होते. उमरानने सध्याच्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत चार सामन्यांत सहा विकेट मिळवल्या. जम्मू-काश्मीरचा संघ ग्रुप सीमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिला. पांचाळ सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत गुजरातचे नेतृत्व करत आहे. टीमने ग्रुप डीमध्ये पहिल्या स्थानावर राहत क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले. 

संघात पृ्थ्वी शॉ, अभिमन्यू ईश्वरन आणि देवदत्त पड्डिकल तसेच गोलंदाज नवदीप सैनी आणि राहुल चाहरलाही सामील करण्यात आले आहे. 

संघ अशा प्रकारे आहे

प्रियांक पांचाळ(कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इश्वरन, देवदत्त पड्डिकल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव, कै गौतम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उमरान मलिक, इशान पोरेल आणि अर्जुन नागवासवाला. 

भारत 'ए'चा कार्यक्रम

२३ ते २६ नोव्हेंबर - पहिला चार दिवसीय सामना ब्लोमफोंटेनमध्ये 
२९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर - दुसरा चार दिवसीय सामना ब्लोमफोंटेनमध्ये 
६ ते ९ डिसेंबर - तिसरा चार दिवसीय सामना ब्लोमफोंटेनमध्ये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी