Umran Malik debut: नेमका कधी होणार उमरान मलिकचा डेब्यू? दुसऱ्या टी-२० मध्येही झाला कानाडोळा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 13, 2022 | 10:58 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA T20 Series | सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

 Umran Malik did not make his debut in the second T20 match between India and South Africa
नेमका कधी होणार उमरान मलिकचा डेब्यू? वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.
  • उमरान मलिकचा डेब्यू कधी होणार याची क्रिकेट वर्तुळाच चर्चा.
  • दुसऱ्या टी-२० मध्येही झाला कानाडोळा.

IND vs SA T20 Series | कटक : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केला नव्हता. म्हणजेच उमरान मलिकला आपल्या पदार्पणाच्या सामन्याच्या प्रतिक्षेतच राहावे लागले. आफ्रिकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले, क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्सच्या जागी रीझा हेंड्रिक्स आणि हेनरिक क्लासेनचा संघात समावेश केला. (Umran Malik did not make his debut in the second T20 match between India and South Africa). 

अधिक वाचा : वेश्याव्यवसायासाठी जबरदस्तीने आणलेल्या दोन मुलींची सुटका

केव्हा होणार उमरान मलिकचा डेब्यू?

जम्मूच्या या वेगवान गोलंदाजाने आयपीएल २०२२ मध्ये सलग १५० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करून सर्वांनाच प्रभावित केले होते. याच त्याच्या पराक्रमामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या भारतीय स्क्वॉडमध्ये जागा मिळाली. दरम्यान मालिकेतील पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीत खेळवला गेला. २११ धावा करून देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आगामी दुसऱ्यात सामन्यात उमरान मलिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल अशी आशा होती. 

युवा खेळाडूंची चाचणी घेण्याची हीच सुवर्णसंधी

मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड मलिकच्या संघात समावेश करण्याच्या शक्यतेने खुश झाले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत या वेगवान गोलंदाजाला खेळण्याची संधी मिळेल की नाही याबाबत संघाने मात्र फारसे संकेत दिले नाहीत. तसेच जेव्हा तुम्ही घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळता तेव्हा युवा खेळाडूंची चाचणी घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचे जाणकार म्हणतात. 

IPL २०२२ मध्ये सर्वांना केले प्रभावित

आयपीएलच्या १५ व्या हंगामात उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना सर्वांना प्रभावित केले. त्याने १४ सामन्यांमध्ये ९.०३ च्या सरासरीने २२ बळी पटकावले. मधल्या षटकांच्या टप्प्यात बळी घेण्यात त्याचा मोलाचा वाटा राहिला. स्पर्धेच्या शेवटच्या काही सामन्यांमध्ये एक उभरता खेळाडू म्हणून त्याची चर्चा रंगली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी