चीनने पाकिस्तानमध्ये तयार केला नवा घातक विषाणू; इंग्लंडच्या 14 क्रिकेटपटुंना झाली बाधा, पहिली टेस्ट संकटात

uncertainty over rawalpindi test, china pakistan working secretly on virus, england squad hit by illness : चीनने पाकिस्तानमध्ये नवा घातक विषाणू (Virus / व्हायरस) विकसित केल्याचे वृत्त येत आहे. या विषाणूची बाधा झाल्यामुळे इंग्लंडचे 14 क्रिकेटपटू आजारी पडल्याचेही वृत्त आले आहे.

uncertainty over rawalpindi test
अज्ञात विषाणूमुळे इंग्लंडचे 14 खेळाडू आजारी, टेस्ट संकटात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • चीनने पाकिस्तानमध्ये तयार केला नवा घातक विषाणू
  • इंग्लंडच्या 14 क्रिकेटपटुंना झाली बाधा
  • पहिली टेस्ट संकटात

uncertainty over rawalpindi test, china pakistan working secretly on virus, england squad hit by illness : चीनने पाकिस्तानमध्ये नवा घातक विषाणू (Virus / व्हायरस) विकसित केल्याचे वृत्त येत आहे. या विषाणूची बाधा झाल्यामुळे इंग्लंडचे 14 क्रिकेटपटू आजारी पडल्याचेही वृत्त आले आहे. नव्या घातक विषाणूमुळे पुन्हा एकदा महामारी आणि लॉकडाऊनचे सत्र सुरू होण्याची शक्यता जगाला भेडसावत आहे.

वेळापत्रकानुसार रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिली टेस्ट मॅच होणार आहे. ही मॅच आजपासून म्हणजेच गुरुवार 1 डिसेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. जर कोणत्याही कारणाने आज खेळ सुरू झाला नाही तर उद्या म्हणजेच शुक्रवार 2 डिसेंबर 2022 रोजी या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. टेस्टच्या थेट प्रक्षेपणाची सुरुवात पाकिस्तानच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता) होणार आहे. पण इंग्लंडचे आजारी पडलेले खेळाडू खेळण्यासाठी सक्षम नसतील तर टेस्ट मॅच रद्द होण्याची शक्यता आहे.

Rishabh Pant: बस्स खूप झाले, आता पंतला आरामाची गरज, पाहा कोणी केलेय विधान

Mohammed Kaif:हिऱ्याच्या शोधात आम्ही सोने गमावले, कैफची टीका

काही दिवसांपूर्वीच चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे रावळपिंडीत एक प्रयोग करत असल्याचे वृत्त आले होते. या वृत्तापाठोपाठ आता राळपिंडीत असलेले इंग्लंडचे 16 पैकी 14 क्रिकेटपटू आजारी पडल्याचे वृत्त आले आहे. इंग्लंडच्या क्रिकेटपटुंना अज्ञात विषाणूची बाधा झाली आहे. 

इंग्लंडची क्रिकेट टीम 17 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली आहे. याआधी 2005 मध्ये इंग्लंडच्या क्रिकेट टीमने पाकिस्तानचा दौरा केला होता. पण यंदाच्या दौऱ्यातील पहिल्या टेस्ट मॅच आधीच इंग्लंडचे 14 क्रिकेटपटू आजारी पडले आहेत.

इंग्लंडचा पाकिस्तान दौरा - 3 टेस्ट मॅचची सीरिज

सर्व टेस्टच्या थेट प्रक्षेपणाची सुरुवात पाकिस्तानच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता) होणार

  1. इंग्लंड वि. पाकिस्तान - 1 ते 5 डिसेंबर 2022, पहिली टेस्ट, रावळपिंडी
  2. इंग्लंड वि. पाकिस्तान - 9 ते 13 डिसेंबर 2022, दुसरी टेस्ट, मुलतान
  3. इंग्लंड वि. पाकिस्तान - 17 ते 21 डिसेंबर 2022, तिसरी टेस्ट, कराची

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी