Under-19 Asia Cup मध्ये भारताचा पराभव, अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानच्या संघाने जिंकला सामना

India Vs Pakistan :: अंडर-१९ आशिया कपच्या (Under-19 Asia Cup) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारता (India)चा २ विकेटने पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी(Batting) करत पाकिस्तान (Pakistan) समोर २३८ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं.

India's defeat in the Under-19 Asia Cup
Under-19 Asia Cup चुरशीच्या लढतीत भारताचा पराभव   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानने ८ विकेट गमावत सामना जिंकला.
  • ५० व्या षटकात पाकिस्तानच्या खेळाडूने मिळवल्या १० धावा.
  • पाकिस्तानसमोर भारताने २३८ धावांचे आव्हान दिले होते.

Under-19 Asia Cup – India Vs Pakistan :नवी दिल्ली : अंडर-१९ आशिया कपच्या (Under-19 Asia Cup) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने भारता (India)चा २ विकेटने पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी(Batting) करत पाकिस्तान (Pakistan) समोर २३८ धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने ८ विकेट गमावत लक्ष्य प्राप्त केलं. विशेष म्हणजे हा चुरशीचा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत चालला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी २ धावा हव्या असताना चौकार मारत पाकने सामना खिशात घातला.

भारताने पाकिस्तानसमोर २३८ धावाचे लक्ष्य ठेवल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करत पाकिस्तानला बॅकफुटवर ठेवलं. परंतु पाकिस्तानच्या खेळाडूकडून जोरदार खेळ करण्यात आला आणि   शेवटच्या ३ षटकांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मात्र, ४९ व्या षटकात भारताने पाकिस्तानला १० धावा दिल्या. इथेच पाकिस्तानचं लक्ष्यामधील अंतर कमी झाले आणि पुन्हा शेवटच्या म्हणजे ५० व्या षटकात देखील पाकच्या खेळाडूंनी १० धावा कुटल्या. याच धमाकेदार फलंदाजीमुळे  पाकिस्तानने विजय मिळवला. विशेष म्हणजे शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला २ धावांची गरज असताना पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला, मात्र चौकार मारत पाकने या दबावाचं रुपांतर विजयात केलं.

भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली, मात्र सुरुवातीलाच अनेक झटके बसले. मात्र, मधल्या फळीतील खेळाडूंनी चांगली बाजू सांभाळली. भारताकडून यष्टीरक्षक आराध्य यादवने अर्धशतक केलं. हरनूर सिंहने देखील ४६ धावांची चांगली खेळी केली. यासह भारताने २३७ धावसंख्या केली. पाकिस्तानकडून जीशान जमीनने ५ विकेट घेतल्या.

पाकिस्तान खेळाडूंची धावसंख्या?

मोहम्मद शाहजाद – ८१ धावा
मोहम्मद इरफान खान – ३२ धावा
अहमद खान* – २९ धावा

भारतीय खेळाडूंची धावसंख्या

आराध्य यादव* – ५० धावा
हरनूर पन्नू – ४५ धावा
राजवर्धन हंगार्गेकर – ३३ धावा

भारतीय संघ : ए. रघुवंशी, हरनूर सिंह, एस. रशीद, यश ढुल (कर्णधार), निशांत सिंधु, राज बावा, कौशल तांबे, आराध्य यादव, विकी ओस्तवाल, रवि कुमार, राजवर्धन

पाकिस्तानचा संघ : ए. बांग्लाजई, माज़ सदाकत, मोहम्मद शहजाद, एच. खान, कासिम अकरम (कर्णधार), इरफान खान, रिजवान महमूद, अहमद खान, अली असफंद, जीशान जमीर, ऐवास अली
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी