अंडर १९ वर्ल्ड कप राडा:  ICC कडून बांग्लादेशी आणि भारतीय खेळाडूंवर कारवाई 

अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशने भारतावर मात करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. पण विजयानंतर जल्लोष करताना बांग्लादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये हामरीतुमरी झाली होती.

under 19 world cup final 2 indians 3 three bangladeshi players charged by icc for unsavoury incidents cricket news in marahti tspo 1
अंडर १९ वर्ल्ड कप राडा:  ICC कडून बांग्लादेशी आणि भारतीय खेळाडूंवर कारवाई   |  फोटो सौजन्य: Twitter

दुबई  :  अंडर १९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशने भारतावर मात करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. पण विजयानंतर जल्लोष करताना बांग्लादेशी आणि भारतीय खेळाडूंमध्ये हामरीतुमरी झाली होती. त्यावेळी बांग्लादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंवर बॅट आणि स्टंप घेऊन धावले होते. अंपायर्सने मधस्थी करत मोठा अनर्थ टाळला. पण या राड्यामुळे बांग्लादेशच्या विजयाला गालबोट लागले. या प्रकरणी आयसीसीने व्हिडिओ फुटेज तपासून वाद घालणाऱ्या ५ खेळाडूंवर कारवाई केली आहे. यात तीन बांग्लादेशी तर दोन भारतीय खेळाडूंवर कारवाई केली आहे. 

बांग्लादेशकडून तौहीद हृदॉय, शमीम हुसैन आणि रकीब उल हसन तर भारताकडून आकाश सिंह आणि रवी बिश्नोई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या पाच खेळाडूंवर आयसीसीचा नियमांचा भंग केल्यामुळे ४ ते १० सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. सामना अतिशय रंगतदार झाला. पण बांग्लादेशच्या विजयानंतर जो प्रकार घडला त्याकडे आयसीसी दुर्लघ करू शकत नाही, असे ICC च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

क्रिकेटमध्ये दुसऱ्याप्रती आदर दाखवणे खूप महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी मैदानात असताना शिस्तीने वागणे, सामना जिंकल्यानंतर किंवा पराभव झाल्यावर प्रतिस्पर्ध्यांचे अभिनंदन किंवा त्यांच्या खेळाचे कौतुक करणे खूप महत्त्वाचे असते. पण अंडर १९ च्या फायनलनंतर अंतीम सामन्यानंतर जे काही घडले. त्यात सर्व नियमांचा भंग झाला. या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईलाही आयसीसीने २ डिमेरीट पॉइंन्ट दिलेले आहेत. 

असे घडले मॅचनंतर 

जसे बांग्लादेशने (Bangladesh) विजय मिळविला. सर्व खेळाडू जल्लोष करण्यासाठी पिचवर पळत आले. त्यानंतर काही बांग्लादेशी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंवर आपत्तीजनक कमेंट केली. भारतीय खेळाडूंनी त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बांग्लादेशी खेळाडू अजूनच आक्रमक झाले. यानंतर मैदानात खंभीर स्थिती निर्माण झाली होती. बांग्लादेशी खेळाडू भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की करू लागले. त्यांना शिव्याही दिल्या. इतके नाही तर काही खेळाडूंनी स्टंप आणि बॅट भारतीय खेळाडूंवर उगारले. या दरम्यान भारतीय संघाचे कोच पारस म्हाब्रे यांनी भारतीय खेळाडूंना शांत केले. 

भारतीय कॅप्टन प्रियम गर्ग म्हणाला, वागणूक अत्यंत वाईट होती

भारतीय क्रिकेट कर्णधार प्रियम गर्ग आम्ही नॉर्मल होतो. आम्हांला वाटते की जय-पराजय हा खेळाचा भाग आहे. अनेक वेळा तुम्ही जिंकतात तर अनेकवेळा तुम्हांला पराभवाचं तोंड पाहावं लागत. पण बांग्लादेशी खेळाडूंची वागणूक अत्यंत वाईट होती, मला वाटतं त्यांनी असं करायला नको होतं. 

मॅच दरम्यान काही बांग्लादेशी खेळाडू काही जास्तच आक्रमक होते. प्रत्येक चेंडूनंतर ते फलंदाजाला काही ना काही बोलत होते. बांग्लादेश विजयाच्या जवळ आल्यावरही त्यांचे काही खेळाडू कॅमेऱ्यासमोर टिपण्णी करताना दिसले. 

बांग्लादेशी कर्णधार अकबर अली म्हणाला मी माफी मागतो 

दुसरीकडे बांग्लादेशी कर्णधार अकबर अली यांनी सांगितले की आमचे काही गोलंदाज खूप भावूक झाले होते आणि ते उत्साहात होते. मॅचनंतर जे काही झाले ते दुर्देवी होते. असे नाही व्हायला पाहिजे होते. माझ्या संघाच्या खेळाडूंकडून चूक झाली आहे. त्याची मी माफी मागतो. असे कोणत्याही स्तरावर नाही व्हायला पाहिजे. मी भारताला शुभकामना देतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी