Under-19 World Cup IND Vs Uganda : भारताकडून युगांडाचा 326 धावांनी पराभव, लागोपाठ तिसऱ्या विजयासह क्वार्टर फाइनलमध्ये धडक

वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) सुरू असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (ICC U-19 World Cup) भारताच्या अंडर 19 (India's Under-19) क्रिकेट संघ (Cricket team) धमाकेदार प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाने युगांडाचा (Uganda) 326 धावांनी दारुण पराभव करत भारताने सलग तिसरा विजय मिळवला आहे.

Under-19 World Cup IND Vs Uganda
युगांडाचा पराभव करत भारत क्वार्टर फाइनलमध्ये   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राज याने नाबाद 162 धावा करत भारतीय फलंजाज शिखर धवनचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला.
  • युगांडा संघाच्या 9 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही.
  • याआधी भारताने अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 425 धावा केल्या होत्या.

Under-19 World Cup : वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) सुरू असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (ICC U-19 World Cup) भारताच्या अंडर 19 (India's Under-19) क्रिकेट संघ (Cricket team) धमाकेदार प्रदर्शन करत आहे. भारतीय संघाने युगांडाचा (Uganda) 326 धावांनी दारुण पराभव करत भारताने सलग तिसरा विजय मिळवला आहे. या  विजयासह भारतीय संघाने क्वार्टर फाइनलमध्ये धडक मारली आहे. नाणेफेक (Coin toss) जिंकत युगांडाने भारताला फलंदाजी करण्याचं आव्हान दिलं.

या संधीचं सोनं करताना भारतीय संघाने निर्धिरित 50 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 405 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघाच्या नाकीनऊ आले. युगांडाचा संघ 19.4 षटकांत फक्त 79 धावा करू शकला. युगांडा संघाच्या 9 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार Pascal Murungi (पास्कल मुरुंगी) याचा अपवाद वगळता एकाही युगांडाच्या फलंदाजाला आपल्या साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय संघाकडून निशांत सिंधू याने सर्वाधिक चार गडी बाद केले. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने तब्बल 405 धावा स्कोरबोर्डवर लावत कमाल केली. यामध्ये अंगकृष रघुवंशी आणि राज बावा यांनी अप्रतिम शतके लगावली. याआधी भारताने अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 425 धावा केल्या होत्या.   

सामन्यात नाणेफेक जिंकत युगांडा संघाने गोलंदाजी घेतली. इथेच त्याच्यांकडून मोठी चूक झाली कारण भारतीय संघाने याच गोष्टीचा फायदा उचलत धमाकेदार फलंदाजी केली. हरनूर सिंग, निशांत संधू प्रत्येकी 15 धावा करुन बाद झाले. पण अंगकृष आणि राज बावा यांनी डाव सांभाळत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यामध्ये अंगकृष याने 144 धावा केल्या. त्याने 120 चेंडूत 22 चौकार आणि चार षटकार लगावले. तर राज याने तब्बल 162 नाबाद धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 14 चौकार आणि 8 षटकार ठोकले.

राजने तोडला शिखरचा रेकॉर्ड

राज याने नाबाद 162 धावा करत भारतीय फलंजाज शिखर धवनचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. शिखरने 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 155 धावा केल्या होत्या. अंडर 19 विश्वचषकातील ही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी