अंडरटेकरचा WWEला अलविदा, तीन दशके होता दबदबा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 22, 2020 | 16:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

The Undertaker retirement from WWE: अंडरटेकर, WWE मधले सगळ्यांना परिचित असलेले नाव. नव्वदच्या दशकातील मुलांना हे नाव नक्कीच माहीत असेल. गेल्या तीस वर्षांपासून या नावाचा दबदबा आहे. 

undertaker
अंडरटेकरचा WWE ला अलविदा, तीन दशके होता दबदबा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • तीन दशके दबदबा कायम
  • अंडरटेकरचा पुनरागमनाचा कोणताही विचार नाही
  • दोन दशकापर्यंत त्याचा रेकॉर्ड२१-० असा राहिला होता. 

मुंबई: जर तुम्ही ८०, ९०च्या दशकात जन्मले आहात तर तुम्ही WWE मधील फाईट नक्कीच बघितली असेल. त्यातील एक नाव सगळ्यांनाच माहीत आहे ते म्हणजे अंडरटेकर. (Undertaker)  तोच अंडरटेकर जो मेल्यावरही जिवंत होतो अशी कहाणी तुम्ही लहानपणी ऐकली असेल.  WWEच्या कार्ड गेममध्ये तर या कार्डची व्हॅल्यूही अधिक होती. आता अंडरटेकर तब्ब तीस वर्षांनी (WWE) च्या रिंगला अलविदा (Retirement) म्हणत आहे. 

तीन दशके दबदबा कायम

अंडरटेकर तब्बल तीन दशके WWE च्या रिंगवर राज्य केले. डेडमॅन या नावाने तो प्रसिद्ध होता. प्रसिद्ध अंडरटेकरची स्टाईल त्याच्या चाहत्यांना पसंत येत असे.

अंडरटेकरचा शेवटचा सामना

अंडरटेकरचा शेवटचा सामना रेसलमेनिया ३६ मध्ये होता. या सामन्यात त्याची लढत एजे स्टाईल्सविरुद्ध होती. अंडरटेकरने या सामन्यात विजय मिळवला होता. अंडरटेकरच्या मते त्याने तीन दशके चाललेले आपले करिअर शेवटची मॅच जिंकत संपवण्याचा योग्य निर्णय घेतला. 

पुनरागमनाचा कोणताही विचार नाही

आपल्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्याने म्हटले, तो माझ्या करिअरमधील शेवटचा सामना होता. आपल्या पुनरागमनाबाबत तो म्हणाला WWEचे चेअरमन विन्स यांच्या सांगण्यावरून पुनरागमन करणार की नाही हे येणारा काळ ठरवेल. दरम्यान, तो पुढे म्हणाला, इर्मजन्सी स्थितीत याबाबत विचार केला जाऊ शकतो. मात्र सध्या कोणताही विचार नाही. 

अंडरटेकरचा शानदार रेकॉर्ड

१९९०मध्ये पहिल्यांदा अंडरटेकरने WWEमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्याने सुरूवातीलाच स्टार हल्क होगनला हरवले होते. रेसलमेनियामध्ये त्याचा रेकॉर्ड (25-2) राहिला होता. दोन दशकापर्यंत त्याचा रेकॉर्ड२१-० असा राहिला होता. 

अंडरटेकरच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर थँक्यूटेकर असे ट्रेंड करू लागले आहे. चाहत्यांनी अंडरटेकरचे आभारही मानले आहेत. 

असे आहे अंडरटेकरचे खासगी आयुष्य

अंडरटेकर सध्या टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये राहतो. रिंगमध्ये जसे त्याचे रूप भयानक आणि गंभीर असते तसा तो खऱ्या आयुष्यात नसतो. त्याला रिंगमध्ये कधीही कोणी हसताना पाहिले नसेल मात्र तो खूपच मजेशीर आणि आनंदी व्यक्ती आहे. अंडरटेकरने तीन लग्ने केली. पहिले लग्न त्याने जोडी लिनशी १९८९मध्ये केले. त्यानंतर १९९९मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०००मध्ये त्याने सारा फ्रँक हिच्याशी लग्न केले. हे लग्न २००७ पर्यंत टिकले. त्यानंतर तिसरे लग्न त्याने २०१०मध्ये मिशेल मॅककूलशी केले. हे लग्न १० वर्षांपासून कायम आहे. त्यांना ४ मुले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी