T20 World Cup वर आयसीसी घेणार मोठा निर्णय, २०२४मध्ये या देशात होणार आयोजन

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 12, 2021 | 16:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

T-20 world cup: आयसीसी आतापर्यंत याबाबत अधिकृत निर्णय घेतलेला नाही. मात्र हा देश निवडण्यामागे आयसीसीचा एका बाणाने दोन पक्षी मारण्याचा डाव आहे. 

t-20 world cup
२०२४मध्ये या देशात होऊ शकते T20 World Cup चे आयोजन 
थोडं पण कामाचं
  • सध्या बीसीसीआयच्या यजमानपदात होत असलेल्या वर्ल्डकपनंतर पुढील वर्षी पुन्हा ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
  • पुढच्या वर्षी टी-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये पार पडत आहे.
  • आयसीसीने आपल्या पुढील टूर्नामेंट चक्रमद्ये २०२४मध्येही एका टी-२० वर्ल्डकपचे आयोजन केले आहे

मुंबई: पापुआ न्यू गिनी(papua new guinea), ओमान(oman) आणि नामिबिया(namibia)सारख्या नव्या संघांनी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१(icc t-20 world cup 2021)मध्ये जागा मिळवून क्रिकेट जगतात(cricket world) आपली एक ओळख बनवली आहे. या नव्या संघांचा समावेश झाल्याने क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार दोन्ही वाढणार आहे. दरम्यान, सध्या या खेळाने अशा एका बाजारात पूर्णपणे एंट्री केलेली नाही जिथे जगातील इतर अनेक खेळांनी आपली ओळख बनवली आहे आणि येथे खेळाच्या माध्यमातून आयसीसी(icc) कमावण्याची मोठी संधी आहे. हे आहे संयुक्त राष्ट्र अमेरिका(united states of america). क्रिकेट खेळणाऱ्या अनेक मोठ्या देशांच्या नागरिकांचे ठिकाण बनलेला अमेरिका देश हळू हळू या खेळाला जागा देत आहे आणि आता हा खेळ अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आयसीसी मोठे पाऊल उचलत आहे.Unites states of america may be host 2024 t-20 world cup

आयसीसी या ठिकाणी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे खेळाचा प्रसार होण्यासोबतच कमाईही वाढेल. सध्या बीसीसीआयच्या यजमानपदात होत असलेल्या वर्ल्डकपनंतर पुढील वर्षी पुन्हा ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुढच्या वर्षी टी-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये पार पडत आहे. आयसीसीने आपल्या पुढील टूर्नामेंट चक्रमद्ये २०२४मध्येही एका टी-२० वर्ल्डकपचे आयोजन केले आहे आणि असं म्हटलं जात आहे की याचे आयोजन अमेरिकेत केले जाऊ शकते. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की अमेरिकेत या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेटची सर्वोच्च संस्था अमेरिकन क्रिकेट बोर्डाला यया स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपवू शकते. 

अमेरिका आणि वेस्ट इंडिजला मिळणार संयुक्त यजमानपद

क्रिकेट पोर्टल क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये दावा कऱण्यात आला आहे की २०२४मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या यजमानपदासाठी क्रिकेट वेस्ट इंडिज आणि क्रिकेट यूएसए यांनी संयुक्तपणे बोली लावली आहे. आयसीसीन आतापर्यंत २०२४च्या स्पर्धेच्या यजमानपदाबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही. आयसीसीने आतापर्यंत २०२४च्या स्पर्धेच्या यजमानपदाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र भविष्यात टी-२० फॉरमॅटच्या माध्यमातून क्रिकेटची लोकप्रियता अधिकाधिक वाढवण्यासाठी आयसीसी या बोलीचा स्वीकार करू शकते. जर याला मंजुरी मिळाली तर अमेरिकेत ही पहिली जागतिक क्रिकेट स्पर्धा असेल. वेस्ट इंडिजने याआधी २००७ आणि २०१०च्या वर्ल्डकपचे यजमानपद केले आहे. 

अनेक आशियाई क्रिकेटर अमेरिकेत खेळतायत क्रिकेट

सध्याच्या घडीला भारत, श्रीलंकेसहित काही दक्षिण आशियाई देशातील खेळाडू अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. काही आठवड्यांपूर्वीच भारताचा माजी अंडर १९चा वर्ल्डकप विजेता कर्णधार उन्मुक्त चंदने अमेरिकेची वाट धरली होती आणि तेथे तो क्रिकेट खेळत आहे. अशातच अमेरिकेत या खेळाला लोकप्रियता मिळण्याची शक्यता अधिक आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी