प्रो कबड्डी लीगमध्ये आज होणार या दोन संघांमध्ये घमासान, कुठे आणि कधी पाहाल live streaming

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 12, 2022 | 16:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

pro kabaddi league: आज १२ जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याला सुरूवात होत आहे. प्रो कबड्डी (Pro Kabaddi)चे सर्व सामने शेरेटन ग्रँड बंगळुरू व्हाईटफिल्ड होटल अड कन्वेंशन सेंटरमध्ये खेळवले जात आहेत. 

pro kabaddi league
प्रो कबड्डी लीगमध्ये आज होणार या दोन संघांमध्ये घमासान 
थोडं पण कामाचं
  • यूपी योद्धाने या हंगामात ८ सामन्यांमध्ये केवळ २ सामन्यांतच विजय मिळवला आहे.
  • हरयाणाला ८ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवला त
  • लीग टेबलमध्ये यूपी योद्धा ८व्या तर हरियाणा स्टीलर्स ९व्या स्थानावर आहेत

मुंबई: प्रो कबड्डी लीगच्या ८व्या हंगामातील ४९व्या सामन्यात यूपी योद्धा (UP Yoddha) आणि हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers)एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्हीही संघांना या हंगामात खास अशी कामगिरी करता आलेली नाही. लीग टेबलमध्ये यूपी योद्धा ८व्या तर हरियाणा स्टीलर्स ९व्या स्थानावर आहेत. up yoddha and haryana steelers will fight in pro kabaddi league

यूपी योद्धाने या हंगामात ८ सामन्यांमध्ये केवळ २ सामन्यांतच विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  २ सामने बरोबरीत सुटले. तर दुसरीकडे हरयाणाला ८ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत सुटला. त्यांना ४ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघ २० -२० गुणांवर आहेत. 

कधी आहे प्रो कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात मुकाबला?

आज १२ जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सामन्याला सुरूवात होत आहे. 

सामना कुठे खेळवला जात आहे?

प्रो कबड्डी (Pro Kabaddi)चे सर्व सामने शेरेटन ग्रँड बंगळुरू व्हाईटफिल्ड होटल अड कन्वेंशन सेंटरमध्ये खेळवले जात आहेत. 

सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येणार?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेल्सवर प्रोकबड्डीचे सामने पाहता येणार. यात स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स कन्नड़ चॅनेलचा समावेश आहे. 

सामना ऑनलाईन पाहता येईल का?

डिस्ने हॉटस्टार अॅपवर तुम्ही या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. 

दोन्ही टीममध्ये कोणकोणते खेळाडू आहेत. 

यूपी योद्धा:-

रेडर्स: अंकित, गुलवीर सिंह, जेम्स कामवेति, मोहम्मद ताग़ी, प्रदीप नरवाल, साहिल, श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल 
डिफेंडर्स: आशु सिंह, आशीष नगर, नितेश कुमार, गौरव कुमार, सुमित 
ऑलराउंडर्स: गुरदीप, नितिन पंवार.

हरियाणा स्टीलर्स:-

रेडर्स: अक्षय कुमार, आशीष, विकाश, मोहम्मद इस्माइल, विनय
ऑलराउंडर्स: अजय, हामिद नादेर , राजेश नारवाल, रोहित गुलिया, श्रीकांत , विकास जागलान
डिफेंडर्स: रवि कुमार , चांद सिंह, राजेश गुर्जर , सुरेंदर नाडा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी