US Open 2019: विजेतेपद स्पेनच्या राफेल नदालकडे, कारकीर्दीतलं 19 वं विजेतेपद

US Open 2019 men's singles semifinal results: यूएस ओपन २०१९ पुरूष एकेरीमध्ये स्पेनच्या राफेल नदालनं विजेतेपद पटकावलं आहे. नदालनं रशियाच्या डॅनिल मेदवेदवचा पराभव केला आहे. 

Rafael Nadal
US Open 2019: स्पेनच्या राफेल नदालकडे विजेतेपद  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • स्पेनच्या राफेल नदालनं यूएस ओपन 2019 च्या पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
  • नदालनं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला आहे.
  • नदालच्या कारकीर्दीतलं हे 19 वं ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे.

US Open 2019 men's singles semifinal results Rafael Nadal vs Daniil Medvedev:  स्पेनच्या राफेल नदालनं यूएस ओपन 2019 च्या पुरूष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. नदालनं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव केला आहे. नदालच्या कारकीर्दीतलं हे 19 वं ग्रॅंडस्लॅम विजेतेपद आहे. राफेल नदालनं इटलीचा माटियो बेरेटिनीवर मात करत यूएस ओपनमध्ये पांचव्यादा अंतिम फेरी गाठली होती. 

नदालनं शेवटच्या सामन्यात डॅनिल मेदवेदवचा 7-5-, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा पराभव करत विजेतेपदाला  गवसणी घातली. राफेल नदाल आणि डॅनिल मेदवेदवचा यांच्यामध्ये तब्बल 5 तास सामना रंगला. पुरूष एकेरीच्या सेमीफायनलच्या दुसऱ्या सेटमध्ये नदालनं 24 व्या मानांरित बेरेटिनीवर 7-6(8-6), 6-4, 6-1 अशी मात दिली होती. पाचव्या अंतिम फेरीत मेदवेदवनं दिमित्रोवप 7-6(7-5), 6-4, 6-3 अशी मात दिली. 

दरम्यान मेदवेदव हा ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मरात सॅफिननंतरचा  (2005) पहिलाच रशियाचा पुरूष टेनिसपटू ठरला आहे. पहिल्यांदा ग्रॅंडस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचलेला 23 वर्षीय मेदवेदवचं किताब जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. 

राफेल नदालनं 27 व्यांदा ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानं 18 ग्रॅंडस्लॅम जिंकल्यात. त्यात राफेलनं आठ वेळा उपविजेतपद मिळालं आहे. नदाल आता त्यांच्या प्रसिद्ध प्रतिस्पर्धी 38 वर्षीय रॉजर फेडरर यांच्यापासून केवळ एका स्थानानं मागं आहे. फेडरर 20 ग्रॅंडस्लॅम एकेरी विजेतेपदांसह अव्वल स्थानी आहे. नदालनं अमेरिकन ओपन स्पर्धा 2010, 2013 आणि 2017 मध्ये जिंकली आहे. याआधी त्यानं 2017 मध्ये अमेरिकन ओपनमध्ये किताब पटकावला होता. 

Rafael Nadal vs Daniil Medvedev, US Open final: Live score

नदाल आणि मेदवेदव एकदाच आमनेसामने आलेत. यात नदालनं गेल्या महिन्यात झालेल्या मॉंटेरियल फायनलमध्ये मेदवेदवला पराभूत केलं होतं. मेदवेदव यंदाच्या सिझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्यानं वॉश्गिंटन ओपन, कॅनडा ओपन, सिनसिनाटी मास्टर्सनंतर यूएस ओपनच्या फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली होती. याआधी कॅनडा ओपनच्या फायनलमध्येही त्याला नदालनं पराभूत केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...