Virat Anushka Daughter: Vamikaला पाहून चाहते झाले क्रेझी, म्हणाले- ही तर विराटची कार्बन कॉपी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 25, 2022 | 13:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vamika: केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा वामिकासह टीम इंडियाला चीअर करताना दिसली. 

vamika
Vamikaला पाहून चाहते म्हणाले- ही तर विराटची कार्बन कॉपी 
थोडं पण कामाचं
  • विराट-अनुष्काची मुलगी वामिका
  • वडिलांना चीअर करताना दिसली वामिका
  • भारत वि दक्षिण आफ्रिका तिसरी वनडे

Ind vs SA ODI:टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची मुलगी वामिकाची एक झलक चाहत्यांना पहिल्यांदा पाहायला मिळाली. केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा वामिकासह टीम इंडियाला चीअर करताना दिसली. विराटने जेव्हा आपले अर्धशतक ठोकले तेव्हा वामिका अनुष्काला कडेवर घेऊन टाळ्या वाजवताना दिसली. 

वामिका एक वर्षांची झाली आहे. ११ जानेवारीला तिचा वाढदिवस होता. विराट कोहलीचे चाहते त्यांची मुलगी वामिकाची पहिली झलक पाहण्यासाठी खूप उत्साही होते. त्यांनी ट्विटरवर आपला आनंदही व्यक्त केला. वामिकाला पाहिल्यानंतर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी तर विराट कोहलीची झेरॉक्स कॉपी असल्याचे म्हटले आहे. 


कोहलीची ६५ धावांची खेळी

विराट कोहलीने तिसऱ्या वनडेत भारताकडून चांगली खेळी केली. त्याने ८४ चेंडूत ६५ धावा कुटल्या, कोहली केशव महाराजच्या बॉलवर आऊट झाला. दरम्यान कोहलीची ही खेळी भारताला काही विजय मिळवून देऊ शकली नाही. भारताला अवघ्या ४ धावांनी पराभव सहन करावा लागला. भारतीय संघ ही मालिका ३-०ने गमावून बसला. 

दक्षिण आफ्रिकेने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ४९.५ ओव्हरमध्ये २८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडिया २८३ धावांवर बाद झाली. सामन्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये दीपक चाहरने जबरदस्त खेळी केली. त्याने ३४ चेंडूत ५४ धावा केल्या. चाहरने आपल्या डावादरम्यान ५ चौकार आणि २ षटकार लगावले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी