मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका(india vs south africa) यांच्यातील पाचवा टी-२० सामना(t-20 match) पावसामुळे रद्द करण्यात आला आणि ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. पाचव्या सामन्यात केवळ ३.३ ओव्हरचा खेळ होऊ शकला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने असे काही केले की ज्यामुळे चाहते खूप नाराज झालेत आणि सोशल मीडियावर त्याच्यावर राग काढत आहेत. users troll ruturaj gaikwad on social media for his behaviour
अधिक वाचा - या सवयींमुळे वजन मेंटेन ठेवणे सहज शक्य
पाचव्या टी-२० सामन्यांत पावसाचा व्यत्यय आल्याने सामना रद्द करण्यात आला. या कारणामुळे ऋतुराज गायकवाड सहकारी खेळाडूंसोबत डगआऊटमध्ये बसला होता. तेव्हा एका ग्राऊंड्समनने त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आणि ऋतुराज गायकवाड त्याला खूप वाईट वागणूक देतो. त्याने ग्राऊंड्समनला हातानी धक्का देत बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्राऊंड्समन सेल्फी घेणे सुरूच ठेवतो. त्यानंतर ऋतुराज त्याला तिथून जाण्यास सांगतो. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bad behaviour by Ruturaj 👎 https://t.co/ZpQ0QkOOrB — Sangram Gawade (@cricketsangram) June 19, 2022
What is Ruthuraj gaikwad doing here 🤔#INDvsSA pic.twitter.com/yvIH8tsDbu — akhilesh reddy (@akhil_996) June 19, 2022
ऋतुराज गायकवाडचा असा अॅटिट्यूड पाहिल्याने क्रिकेट चाहते खूप नाराज झाले आहेत. एका युझरने लिहिले की ऋतुराज गायकवाडला असे केले नव्हते पाहिजे. दुसऱ्या युझरने लिहिले की ऋतुराज गायकवाडने खूप चुकीचे केले. त्याने ग्राऊंड्समनसोबत असे केले नाही पाहिजे. तिसऱ्या युझरने सल्ला दिला की एक क्रिकेटरकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
IND🇮🇳 vs SA🇿🇦 — Jeet Singh (@jeet_singh070) June 19, 2022
Match no. 5 🏏
Chinnaswamy Stadium, Bangaluru 🏟️
Match delayed due to rain 🌧️
Why the heck Ruturaj Gaikwad behaving like this with ground staff? Just for a selfie he is being arrogant towards him. This kind of behaviour is really unacceptable in gentleman's game. pic.twitter.com/A1sjqnMQu7
अधिक वाचा - पीएम आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! सर्वांवर परिणाम
द. आफ्रिकेविरुद्ध भुवनेश्वर कुमारने आपल्या कमाल गोलंदाजीने साऱ्यांची मने जिंकली त्याने पाच टी-२० सामन्यांमध्ये ६ विकेट मिळवले. टीम इंडियाकडून तो सगळ्यात मोठा मॅच विनर ठरला. याशिवाय दिनेश कार्तिक, इशान किशन आणि हार्दिक पांड्याने पूर्ण मालिकेत चांगली फलंदाजी केली. या प्लेयर्समुळे टीम इंडिया मालिकेत पुनरागमन करू शकली.