Rishabh Pant वर ड्रिंक अ‍ॅंड ड्राइव्हची केस? पोलिसांनी दिली मोठी अपडेट

Rishabh Pant Car Accident : क्रिकेटर ऋषभ पंतच्या कार अपघातप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. खुद्द पंतनेच हा खुलासा केला आहे. अपघातानंतर पंत यांना रुरकीच्या सक्षम रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा पंत यांनी सांगितले होते की, डुलकी लागल्याने कार डिव्हायडरला धडकली होती.

Uttarakhand Police released statement regarding Rishabh Pant's accident
Rishabh Pant वर ड्रिंक अ‍ॅंड ड्राइव्ह? पोलिसांनी दिली मोठी अपडेट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऋषभ पंतच्या कार अपघातप्रकरणी आता मोठा खुलासा झाला
  • अपघातानंतर पंतवर रुरकीच्या सक्षम रुग्णालयातच उपचार
  • डुलकी लागल्याने कार डिव्हायडरला धडकली

Rishabh Pant Car Accident  : क्रिकेटपटू ऋषभ पंतचा अपघात अतिवेगाने किंवा मद्यधुंद अवस्थेमुळे झाला नसल्याचे उत्तराखंड पोलिसांनी शनिवारी सांगितले. अपघाताचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये क्रिकेटरची कार रस्त्याच्या दुभाजकाला आदळताना दिसत आहे, कार भरधाव वेगाने येत आहे. हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) अजय सिंह यांनी सांगितले की, आम्ही उत्तर प्रदेश सीमेपासून नरसन येथील अपघातस्थळापर्यंत आठ ते दहा स्पीड कॅमेरे तपासले आहेत. क्रिकेटपटूच्या कारने ताशी 80 किमी वेगाची मर्यादा ओलांडलेली नाही. (Uttarakhand Police released statement regarding Rishabh Pant's accident)

अधिक वाचा : Horoscope 1 January 2023 : नवीन वर्षात कोणाच्या अडचणी वाढणार?, कोणाचा शुभ काळ सुरू होणार?

एसएसपी यांनी निवेदन दिले

एसएसपी पुढे म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार वेगात असताना डिव्हायडरला धडकल्यानंतर कार हवेत उडत असल्याचे दिसले. आमच्या तांत्रिक पथकानेही अपघातस्थळाची पाहणी केली. एसएसपी म्हणाले की, रुरकी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही तो पूर्णपणे सामान्य असल्याचे सांगितले. त्यामुळे तो स्वत:ला गाडीतून यशस्वीपणे बाहेर काढण्यात यशस्वी झाला. मद्यपी व्यक्ती गाडीतून बाहेर पडू शकत नाही.

अधिक वाचा :Pausha Putrada Ekadashi Vrat Kataha: पुत्रदा एकादशी 2023; जाणून घ्या व्रत कथा, शुभ मुहूर्त, पूजा विधी
 

झोपेमुळे पंतचा अपघात झाला

उत्तराखंडचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अशोक कुमार यांनी सांगितले की, पंतला डुलकी लागली होती, ज्यामुळे हा अपघात झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार भरधाव वेगात रस्त्याच्या दुभाजकाला धडकताना दिसत आहे. त्याने कोणालाही दुखापत केली नसल्यामुळे कारवाई होणार नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी