वेंकटेशने पूर्ण केली हार्दिकची कमतरता, हर्षल तर लंबी रेस का घोडा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 22, 2021 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

वर्ल्डकपची फायनल खेळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच न्यूझीलंडचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी आला होता. येथे विल्यमसन्सच्या अनुपस्थितीत संघाची कामगिरी खराब राहिली. भारताला या टी-२० मालिकेतून ५ सकारात्मक गोष्टी समोर आल्या.

india vs new zealand
वेंकटेशने पूर्ण केली हार्दिकची कमी, हर्षल लंबी रेस का घोडा 
थोडं पण कामाचं
  • आयपीएलचा पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल मधल्या ओव्हरमध्ये एक चांगला सीमर गोलंदाजीचा पर्याय म्हणून समोर आला आहे.
  • भारताने दीर्घकाळानंतर खालच्या फळीतील फलंदाजांचे योगदान पाहिले.
  • अश्विन आणि अक्षर पटेलने तीन सामन्यांत सात विकेट घेतल्या.

मुंबई: तिसऱ्या आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताने(indiaa) न्यूझीलंडला(new zealand) रविवारी ७३ धावांनी हरवत तीन सामन्यांची मालिकेत क्लीनस्वीप(clean sweep) केले. या मालिकेसोबतच भारताने आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी(t-20 world cup) आपली तयारी सुरू केली आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर झालेल्या या मालिकेत भारताने शानदार कामगिरी केली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना सात बाद १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण डाव १७.२ ओव्हरमध्ये १११ धावांवर गुंडाळला गेला. वर्ल्डकपची फायनल खेळल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच न्यूझीलंडचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी आला होता. येथे विल्यमसन्सच्या अनुपस्थितीत संघाची कामगिरी खराब राहिली. भारताला या टी-२० मालिकेतून ५ सकारात्मक गोष्टी समोर आल्या. venkatesh, harshal new player good play during india vs new zealand match

टी-२० वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याचा फॉर्म, फिटनेस आणि संघातील त्याच्या स्थानावरून अनेल सवाल केले जात होते. मात्र अखेरीस तो बाहेर केला. त्याच्या जागी वेंकटेश अय्यरला स्थान देण्यात आले. अय्यरन आपल्या कामगिरीने आणि टॅलेंटने साऱ्यांना प्रभावित केले. मालिकेतील तीनही सामन्यात त्याने गोलंदाजी केली. शेवटच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही केली. त्याने २० धावा काढल्या आणि गोलंदाजीत ३ ओव्हरमध्ये १२ धावा देत एक विकेट मिळवला. 

आयपीएलचा पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल मधल्या ओव्हरमध्ये एक चांगला सीमर गोलंदाजीचा पर्याय म्हणून समोर आला आहे. पटेल या मालिकेत दाखवले की तो विकेट घेण्यात हुशार आहे आणि स्लो बॉल टाकण्याची त्यांच्यात क्षमता आहे जी त्याला धोकादायक गोलंदाज बनवते. मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरने टी-२० वर्ल्डकपदरम्यान त्या भूमिकेसाठी संघर्ष केला होता आणि तज्ञांच्या मते राहुल द्रविडची नजर हर्षल पटेलवर टिकून आहे. 

खालच्या फळीतील खेळाडूंची कमाल

भारताने दीर्घकाळानंतर खालच्या फळीतील फलंदाजांचे योगदान पाहिले. दरम्यान, दीपक चाहरर आणि हर्षल पटेल यांनी तिसऱ्या टी-२०दरम्यान ही झलक दाखवली की ते हा प्रॉब्लेम सोडवू शकतात. हर्षल पटेल आणि दीपक चाहरने केवळ १९ बॉलमध्ये ३९ धावा करत संघाला १८० धावापार नेलं. 

अश्विन-अक्षरच्या रूपाने मिळाली नवी स्पिन जोडी

अश्विन आणि अक्षर पटेलने तीन सामन्यांत सात विकेट घेतल्या. या दरम्यान दोघांचा इकॉनॉमी रेट ६ पेक्षा कमी राहिला आहे. रवीचंद्रन अश्विन आणि अक्षऱ पटेलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोठे यश मिळवले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी