Vicky Ostwal: लोणावळा टू वेस्ट इंडिज व्हाया 'local trains'

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 18, 2022 | 14:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

vicky ostwals journey: टीम इंडियाच्या वर्ल्डकप संघातील हा खेळाडू दररोज करायचा लोणावळा टू मुंबई लोकलचा प्रवास...जाणून घ्या त्याच्याबद्दल

vicky ostwal
Vicky Ostwal: लोणावळा टू वेस्ट इंडिज व्हाया 'local trains' 
थोडं पण कामाचं
  • अंडर १९ वर्ल्डकप २०२२
  • विकी ओसवालचा विजयी पंच
  • लोणावळ्यावरून मुंबईला सरावासाठी करत असे दररोज प्रवास

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत(u 19 world cup 2022) भारताची सुरूवात दमदार झाली आहे. भारताने(india beat south africa) पहिल्याच सामन्यात द. आफ्रिकेला धूळ चारत विजयी सुरूवात केली. यासोबतच अवघ्या २४ तासांता पराभवाचा बदला घेतला. भारताच्या वरिष्ठ संघाला द. आफ्रिकेत कसोटी मालिकेत पराभवास सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर भारताच्या ज्युनियर संघाने वर्ल्डकपमध्ये आफ्रिकेला हरवले. Vicky ostwal daily journey from lonawla to Mumbai for cricket practice 

यात विजयाचा शिल्पकार ठरला तो विकी ओसवाल(vicky ostwal). त्याने गोलंदाजीत विजयी पंच लगावताना आफ्रिकेला नेस्तनाबूत केले. त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. वेंगसरकर अकादमीमधदील कोच मोहन जाधव यांनी यावेळी विकीने सरावासाठी जे काही कष्ट घेतले त्याची आठवण करून दिली. त्यांनी एका इंग्रजी वेबसाईटला ही माहिती दिली. वयाच्या नवव्या वर्ी तो लोणावळा येथून मुंबईला आपल्या वडिलांसोबत सरावासाठी प्रवास करत असे. 

जाधव यांनी सांगितले, मी त्यांना कधी मैदानावर उशीर तर कधी खूपच लवकर आलेले पाहत असे. त्यामुळे एके दिवशी मी त्यांना विचारले की तुम्ही कुठे राहता. यावर विकीने सांगितले की तो लोणावळावरून येतो. ट्रेन पकडतात, तिथेच खातात आणि पुन्हा परत जातात. त्यांची तर बरीचशी ताकद त्या लोकल ट्रेनच्या प्रवासातच खर्च होत असेल. मात्र त्याने कधीही कंटाळा केला नाही. तो नेहमी ग्राऊंडवर फ्रेश दिसायचा आणि कधीही थकलेला दिसायचा नाही. 

विकीच्या नावाची चर्चा सुरू असताना जाधव यांनी या आठवणी जाग्या केल्या. अंडर १९ वर्ल्डकपच्या पहिल्या द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट घेतल्या. २८ धावांमध्ये ५ विकेट अशी त्याची कामगिरी राहिली. त्याच्या या जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर भारताला विजय मिळवता आला. 

जाधव यांनी पुढे सांगितले,  सुरूवातीला जेव्हा तो ९ वर्षांचा होता तेव्हा तो मुंबईतील वेंगसरकर अकादमीत प्रवेश घेण्यासाठी गेला होता. मात्र तो मुंबईचा नसल्याने त्याला अकादमीचे कार्ड मिळाले नाही. अखेर मी त्याच्या वडिलांना पुण्यात शिफ्ट होण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी तो मान्यही केला. त्यानंतर विकीचा चिंचवडमधील वेंगसरकर क्रिकेट अकादमीतून हा प्रवास सुरू झाला. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी