Chris Devlis | नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानावर कित्येक वेळा असे पाहायला मिळते की एखादा फलंदाज खेळपट्टीवर टिकला की विरोधी संघातील गोलंदाजांना अगदी सळो की पळो करून सोडतो. ऑस्ट्रेलियामध्ये देखील असेच काहीसे पाहायला मिळाले. जेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूने चौकार आणि षटकारांचा जणू काही पाऊसच पाडला आणि गोलंदाज फलंदाजांसमोर अक्षरश: चितपट झाले. व्हिक्टोरिया प्रीमियर क्रिकेटच्या एका सामन्यात मेलबर्न संघाचा फलंदाज ख्रिस डेव्हलिसने (Chris Devlis) केवळ ७२ चेंडूत २३७ धावांची आक्रमक खेळी करून सर्वांचेच लक्ष्य वेधून घेतले. ( Victoria Premier Cricket Australian batsman Chris Devilis made history on the field scoring 237 off just 72 balls).
अधिक वाचा : बुलेट-ॲव्हेंजर सारख्याच इलेक्ट्रिक बाइकची झाली एन्ट्री
कॅपरवेल मॅगपाइस संघाच्या या सलामीवीराने आपल्या खेळीत २० चौकार आणि २४ षटकार लगावले. ख्रिस सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी आला होता. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या खेळीतील ७२ चेंडूमधील ४४ चेंडूना त्याने बाउंड्रीच्या बाहेर पाठवले. ख्रिस डेव्हलिसच्या या खेळीच्या बदल्यात त्याच्या संघाने ५० षटकांत ४ बळींच्या नुकसानात ४४१ धावांची विशाल धावसंख्या उभारली. या विक्रमी आव्हानाचा पाठलाग करताना किंग्स्टन हॉर्थोनचा संघ ८ बळींच्या नुकसानात केवळ २०३ एवढ्याच धावा करू शकला.
दरम्यान, व्हिक्टोरिया प्रीमियर क्रिकेटच्या पुरूष गटातील दुसऱ्या श्रेणीच्या इतिहासातील ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे. ख्रिस डेव्हलिसच्या आधी मॉर्गन पर्सन क्लार्कने २०१५-१६ या हंगामात नाबाद २५४ धावांची खेळी केली होती.