Cricket News : एसएम स्पोर्ट्स दादर आणि रिअल सीसीचा विजय 

Mumbai Cricket News : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम भरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत आज झालेल्या दोन सामन्यात एसएम स्पोर्ट्स दादर आणि रिअल सीसीचा विजय झाला आहे. 

Victory of SM Sports Dadar and Rear CC in late shree ram baran momorial premier league 2021
एसएम स्पोर्ट्स दादर आणि रिअर सीसीचा विजय  
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या आझाद मैदानावर दिवंगत राम भरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१
  • ज झालेल्या दोन सामन्यात एसएम स्पोर्ट्स दादर आणि रिअर सीसीचा विजय झाला आहे.
  •  अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १६ स्पर्धेचे आयोजन करतात.

Mumbai Cricket News । मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम भरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत आज झालेल्या दोन सामन्यात एसएम स्पोर्ट्स दादर आणि रिअल सीसीचा विजय झाला आहे. (Victory of SM Sports Dadar and Rear CC in late shree ram baran momorial premier league 2021)

 
 अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १६ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली. 
 
 आजच्या पहिल्या सामन्यात एसएम स्पोर्ट्स दादरने अवर्स क्रिकेट क्लब विरारचा आठ गडी राखून पराभव केला. गेल्या सामन्यातील शतकवीर देवांश राय याने नाबाद ६१ धावा केल्या. तर सामन्यात सोशम शेलार यांने ५ विकेट घेतल्या. 

मॅचचा स्कोअर कार्ड पुढील प्रमाणे 

virar vs dadar

 दुसऱ्या सामन्यात रिअल सीसीने अविनाश सावळी फाउंडेशनचा ९ विकेटने पराभव केला. अविनाश सावळी फाउंडेशन २९.४ षटकात १०७ धावात गारद झाले. त्यांच्याकडून सर्वाधिक अभिज्ञान कुंडू याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर रिअल सीसीकडून आयुष पाटील सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याला मनन भानुशालीने साथ देत ३ विकेट घेतल्या. प्रत्युतरादाखल वंश अकबरी याने ६० धावांची शानदार खेळी केली. 

मॅचचा स्कोअर कार्ड पुढील प्रमाणे

avi vs real

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी