मुंंबई: ड्वायेन ब्रावोने(dwayne bravo) जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून(international cricket) संन्यास घेतला असला तरी तो जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये खेळून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनचा(allu arjun) सिनेमा पुष्पामधील(pushpa) श्रीवल्ली(srivalli) गाण्यातील हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. चाहत्यांपासून सेलिब्रेटी ही हुक स्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर डेविड वॉर्नर(david warner), भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा(ravindra jadeja) या स्टेपवर थिरकताना दिसला होता. आता या लिस्टमध्ये वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर ड्वायेन ब्रावोचाही नावाचा समावेश केला आहे. Video: After warner now bravo makes Srivalli step
बांगलादेश प्रीमीयर लीगमध्ये कोमिल्ला विक्टोरिसन्सविरुद्ध १८व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर महिदुल इस्लामने मोठा शॉट खेळत धावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल सरळ फिल्डरच्या हातात गेला. विकेट घेतल्यानंतर ब्रावो हुक स्टेप करताना दिसला. विकेट घेतल्यानंतर डान्स करणाऱ्या ब्रावोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याआधी ड्वायेन ब्रावोच्या आयपीएल फ्रेंचायजी चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडिया अकाऊंटवर हा ब्रावोचा हुक स्टेप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. चेन्नई सुपर किंग्सने आगामी हंगामासाठी ब्रावोला आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाआधी रिलीज केले होते. सीएसकेने एमएस धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली यांना रिटेन केले आहे.
अधिक वाचा - सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार राष्ट्रवादीत
ड्वायेन ब्रावोने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने वेस्ट इंडिजसाठी २०१२ आणि २०१६चा वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका बजावली होती. ब्रावोने ४० कसटी, १६४ वनडे आणि ९१ टी-२० सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे..
अधिक वाचा - 73th Republic Day : जाणून घ्या राजपथावरील परेडची वैशिष्ट्ये
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पुष्पा हे हुक स्टेप करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वॉर्नर अल्लू अर्जुन स्टाईलमध्ये श्रीवल्ली गाण्यावर डान्स करत आहे. क्रिकेटरच्या या पोस्टवर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचवेळी पुष्पा अभिनेता अल्लू अर्जुननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.