VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने तोडली दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची बॅट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 05, 2021 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू असताना पाकिस्तानी खेळाडूने त्यांच्या कर्णधाराची बॅट तोडली. 

cricket
पाकिस्तानी खेळाडूने तोडली दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची बॅट 

थोडं पण कामाचं

  • ही घटना दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू असताना १६व्या षटकादरम्यान घडली.
  • बॅट तुटली आणि नव्या बॅटने काढल्या ९२ धावा
  • द. आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत १७ धावांनी विजय मिळवला.

मुंबई: दक्षिण आफ्रिकेने(south africa) पाकिस्तानविरुद्ध(pakistan) जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडेत(oneday match) विजय मिळवला. यासोबतच दोन्ही संघांनी या मालिकेत बरोबरी साधली आहे. मात्र त्याआधी मैदानावर जे काही घडले ते क्वचित याआधी पाहायला मिळाले असेल. खरंतर, एका पाकिस्तानी खेळाडूने दुसऱ्या वनडेदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची बॅटच तोडली. द. आफ्रिकेचा संघ फलंदाजी करत असताना ही घटना घडली. 

आता हे कसे आणि का घडले जाणून घ्या. ही घटना दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू असताना १६व्या षटकादरम्यान घडली. ही ओव्हर पाकिस्तानचा गोलंदाज तसेच ऑलराऊंडर फहीम असरफ टाकत होता. या ओव्हरमधील चौथा बॉल स्ट्राईकवर उभा असलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावउमाच्या बॅटवर लागला आणि बघता बघता त्याच्या बॅटचे दोन तुकडे झाले. 

बॅट तुटली आणि नव्या बॅटने काढल्या ९२ धावा

जेव्ही ही घटना घडली तेव्हा कर्णधार बावउमा ६ धावांवर खेळत होता. बॅट तुटल्यानंतर त्याने नवी बॅट मागवली. तर या नव्या बॅटने त्याने आणखी ८६ धावा काढल्या. म्हणजेच त्याने आपल्या डावात ९२ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट गमावत ३४१ धावा केल्या तर पाकिस्तानी खेळाडू फहीम अशरफने या सामन्यात ९ ओव्हर गोलंदाजी करताना केवळ अॅडन मार्क्रमच्या रूपाने केवळ एक विकेट मिळवली. 

द. आफ्रिकेने १७ धावांनी जिकली दुसरी वनडे

द. आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत १७ धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानकडून फखर जमांने १९३ धावांची दमदार खेळी केली. मात्र ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी