व्हिडीओः जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीने डेव्हिड वॉर्नर चकीत

Video Viral David Warner clean bowled by Jofra Archer जोफ्राने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला टाकलेल्या घातक चेंडूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Video Viral David Warner clean bowled by Jofra Archer
व्हिडीओः जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीने डेव्हिड वॉर्नर चकीत 

थोडं पण कामाचं

  • व्हिडीओः जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीने डेव्हिड वॉर्नर चकीत
  • वॉर्नर सहा धावा करुन परतला
  • ऑस्ट्रेलियाचा विजय

मँचेस्टर: इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिली वन डे शुक्रवारी मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात रंगली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी खेळाडूंची निवड वन डे च्या दृष्टीने केली होती. जेसन रॉयचे (Jason Roy) इंग्लंडच्या संघात पुनरागमन झाले. ऑस्ट्रेलियाच्या संघात मार्नस लबुशेनला (Marnus Labuschagne) संधी मिळाली. स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दुखापतीमुळे विश्रांती घेत होता. त्याला नेटमध्ये सराव करताना दुखापत झाली. 

पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाची वाईट सुरुवात

पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात वाईट झाली. सामन्याच्या चौथ्या षटकांत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) एक घातक चेंडू टाकला. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) या चेंडूचा अंदाज आला नाही. जोफ्रा आर्चरने आऊटस्विंगर टाकल्याचे लक्षात येताच डेव्हिड वॉर्नरने स्टंप कव्हर करुन खेळण्याचा निर्णय घेतला. पण त्याने स्टंप कव्हर करण्याआधीच चेंडू वेगाने बेल्स उडवून पुढे गेला होता. डेव्हिड वॉर्नर त्रिफळाचीत झाला. क्लीनबोल्ड (clean bowled) झालेला वॉर्नर शेवटपर्यंत चेंडू न समजल्यामुळे अवाक झाला. आपण बाद झालो हो लक्षात आल्यावर तो निराश झाला. फक्त सहा धावा करुन डेव्हिड वॉर्नर तंबूत परतला.  जोफ्रा आर्चरने डेव्हिड वॉर्नरला चक्रावून टाकण्यासाठी वेगाने आऊटस्विंगर (outswinger ball) टाकला होता. सोशल मीडियावर (Social Media) जोफ्राने टाकलेल्या चेंडूचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. अनेक क्रिकेटप्रेमींनी (Cricket Lovers) जोफ्राला दाद दिली आहे. कौतुकास्पद कामगिरीसाठी त्याचे अभिनंदन केले आहे. (Video Viral David Warner clean bowled by Jofra Archer)

ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ९ बाद २९४ धावा

मँचेस्टरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १२३ धावांत निम्मा संघ गमावला होता. ऑस्ट्रेलिया संकटात असताना ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) या दोघांनी विकेट टिकवून छान खेळ केला. दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेलने ४ चौकार आणि ४ षटकारांच्या  जोरावर ५९ चेंडूत ७७ धावा केल्या तर मिचेल मार्शने १०० चेंडूत सहा चौकारांच्या जोरावर ७३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेल आणि मार्शच्या कामगिरीच्या जोरावर ५० षटकांत ९ बाद २९४ धावा केल्या.

इंग्लंड ५० षटकांत ९ बाद २७५ धावा

धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला ५० षटकांत ९ बाद २७५ धावा एवढीच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) याने दहा षटकांपैकी ३ निर्धाव षटके टाकली. त्याने २६ धावा देत ३ जणांना बाद केले. अप्रतिम गोलंदाजी केल्याबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने  गौरविण्यात आले. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्‍टोने (Jonny Bairstow) ८४ आणि सॅम बिलिंग्सने (Sam Billings) ११८ धावा केल्या. पण त्यांची कामगिरी इंग्लंडचा पराभव टाळू शकली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी