Vijay Hazare Trophy Final: दुस-यांदा चॅम्पियन बनला सौराष्ट्र, 'सेंच्युरी मशीन' गायकवाडची तुफानी खेळी ठरली नाकामी

Vijay Hazare Trophy Final 2022: महाराष्ट्र आणि सौराष्ट्रामध्ये अंतिम सामना खेळला गेला. यात सौराष्ट्रचे गोलंदाज आणि महाराष्ट्राचे फलंदाज यांच्यातील लढत ही जोरदार झाली. अनुभवी कर्णधार जयदेव उनाडकटने 2007 नंतर दुसऱ्यांदा सौराष्ट्रला चॅम्पियन बनवलं.

 Saurashtra became champions for the second time
'सेंच्युरी मशीन' गायकवाडची तुफानी खेळी ठरली नाकामी   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • अनुभवी कर्णधार जयदेव उनाडकटने 2007 नंतर दुसऱ्यांदा सौराष्ट्रला चॅम्पियन बनवलं.
  • महाराष्ट्राचा पराभव करून सौराष्ट्रने 15 वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी जिंकली.
  • ेल्डन जॅक्सनने नाबाद 133 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Vijay Hazare Trophy Final 2022:  अहमदाबाद:  महाराष्ट्राचा पराभव करून सौराष्ट्रने(Saurashtra)15 वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) जिंकली आहे. फॉर्ममध्ये असलेला कर्णधार (captain) ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad)फायनलमध्येही  (finals) शतक झळकावले, पण तो महाराष्ट्राला (Maharashtra)चॅम्पियन (Champion) बनवू शकला नाही. या विजेतेपदाच्या सामन्यात सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून शानदार खेळ दाखवत महाराष्ट्राला 248/9 असे रोखले. प्रत्युत्तरात वरिष्ठ यष्टीरक्षक फलंदाज शेल्डन जॅक्सनने (Sheldon Jackson) नाबाद 133 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.  (Vijay Hazare Trophy Final: Saurashtra became champions for the second time)

अधिक वाचा  :  Family Tips : तुमचा पिंटू-पिंटी नातेवाईकांकडे का जात नाही?

गायकवाड जबरदस्त फॉर्मात 

विजय हजारे ट्रॉफीमधील ऋतुराज गायकवाडची खेळी पाहून त्याला भारतीय क्रिकेटमधील लंबी रेस का घोडा असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र संघाचा कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाडने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि आसामविरुद्ध मोठी शतके झळकावली.

अधिक वाचा  : राज्यात सरकारी कारभार 'पेपरलेस' होणार

दरम्यान गायकवाड सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता परंतु पाच सामन्यात गायकवाडने जोरदार खेळ करत 660 धावा केल्या. यात एका षटकात 7 षटकार मारण्याचा विक्रमही समाविष्ट आहे. उत्तर प्रदेशविरुद्धच्या या सामन्यात त्याने 220 धावा केल्या आणि त्यानंतर आसामविरुद्धच्या उपांत्य फेरीत 168 धावा केल्या. 
 

vijay hazare trophy final 2022, sheldon jackson saurashtra, saurashtra vijay hazare trophy champion, ruturaj gaikwad vijay hazare trophy 2022, maharashtra vs saurashtra,Times now marathi, times now, times now marathi news, marathi, marathi news paper, marathi news, online, Samachar, Marathi latest news,

शेल्डन जॅक्सनने आयपीएलचा राग काढला

देशांतर्गत सामन्यांमध्ये धावा करणाऱ्या शेल्डन जॅक्सनला भारतीय संघात खेळण्याची संधी कधीच मिळाली नसेल, पण त्याने प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध केले आहे.  27 सप्टेंबर 1986 रोजी गुजरातमधील भावनगर येथे जन्मलेल्या जॅक्सनचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. रणजी ट्रॉफीच्या 2012-13 हंगामात सौराष्ट्रच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाल्यामुळे त्याच्या बालपणीच्या मेहनतीचे फळ मिळाले.  

आयपीएल 2013 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. 2017 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला सामील केले, परंतु अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. आता पुन्हा एकदा केकेआरने त्याला मिनी लिलावापूर्वी  सोडले आहे.


  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी