विजय हजारे ट्रॉफीमध्ये विक्रमांचा 'ऋतु': सलग तिसऱ्या शतकासह ऋतुराजनं केलं कोणीही न केलेला विक्रम

विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात ऋतुराजने चार शतक झळकावली आहेत. ऋतुराजने सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध 124 धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामात चार शतक करण्याची ऋतुराजची ही पहिली वेळ नाहीये. याआधी गेल्या हंगामात ऋतुराजने अशी कामगिरी केली होती.

RituRaj gaikwad made an unprecedented record
विजय हाजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराजचा भीमपराक्रम   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • या हंगामात ऋतुराजने 5 सामन्यात 220 च्या सरासरीने 660 धावा केल्या आहेत.
  • ऋतुराजने या हंगामात चार शतकं ठोकली आहेत.
  • ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.

अहमदाबाद:  विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) ऋतुराज नावाचे वादळ विक्रमावर विक्रम (record) करत आहे. आज  महाराष्ट्र ( Maharashtra) आणि सौराष्ट्र यांच्यात लढत सुरू आहे. अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा  कर्णधार (Captain) ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) शतकी खेळी केली. ऋतुराजने 131 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 108 धावा केल्या. एका षटकात 7 सिक्स मारण्याचा विक्रम केल्यानंतर ऋतुराज गायकवाडने सलग तीन शतक केली आहेत. दरम्यान या हंगामात ऋतुराजने चार शतके केली असून त्याने यात विक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे.  (Vijay Hazare Trophy: RituRaj made an unprecedented record)

अधिक वाचा  : आफताबच्या नार्को टेस्टमधून मिळाली IMP माहिती

या स्पर्धेतील ऋतुराजचे हे सलग तिसरे शतक आहे. याआधी त्याने क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध 220 धावा केल्या. त्यानंतर सेमीफायनलमध्ये आसामविरुद्ध 168 धावांची खेळी केली. या हंगामात ऋतुराजने 5 सामन्यात  220 च्या सरासरीने 660 धावा केल्या आहेत. ऋतुराजने या हंगामात चार शतकं ठोकली आहेत. पहिल्या सामन्यात रेल्वेविरुद्ध त्याने 124 धावा केल्या होत्या. 

विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात ऋतुराजने चार शतक झळकावली आहेत. ऋतुराजने सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध 124 धावा केल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामात चार शतक करण्याची ऋतुराजची ही पहिली वेळ नाहीये. याआधी गेल्या हंगामात ऋतुराजने अशी कामगिरी केली होती. दरम्यान आजच्या अंतिम सामन्यात 108 धावांची खेळी करत ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्याने रॉबिन उथप्पा आणि अंकित बावने यांना मागे टाकले. 

अधिक वाचा  : पंधरा दिवसांसाठी मुंबई शहरात संचारबंदी, पण का?

ऋतुराजच्या नावावर या स्पर्धेत 12 शतक झाली आहेत. उथप्पा आणि बावने यांनी प्रत्येकी 11 शतक केली आहेत. ऋतुराजने या स्पर्धेच्या गेल्या 10 पैकी 8 डावात शतक झळकावले आहे.ऋतुराज गायकवाड याने एका हंगामात चार शतके केली असली तरी स्पर्धेच्या एका हंगामात नारायण जगदीशनने पाच शतके केली आहेत. यामुळे एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. 

2021 पासून विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराजची कामगिरी 

एका ओव्हरमध्ये सहा पेक्षा अधिक षटकार मारणारा ऋतुराज हा 10वा फलंदाज आहे. विजय हजारे ट्रॉफीत एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम ठरला आहे. 

 112 चेंडूत 136 धावा
143 चेंडूत नाबाद 154 धावा
129 चेंडूत 124 धावा
18 चेंडूत 21 धावा
132 चेंडूत 168 धावा
123 चेंडूत नाबाद 124 धावा
42 चेंडूत 40 धावा
159 चेंडूत नाबाद 220 धावा
126 चेंडूत 168 धावा

 एका ओव्हरमध्ये 7 षटकार

ऋतुराज गायकवाडने उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात शिवा सिंहला एका ओव्हरमध्ये 7 षटकार मारले. त्याने 7 चेंडूत 43 धावा केल्या. लिस्ट-ए च्या क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी