World Cup: विजय शंकरच्या दुखापतीबाबत बुमराहने दिले ताजे अपडेट

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jun 20, 2019 | 22:36 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Vijay Shankar Injury Update: शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकप २०१९मधून बाहेर पडल्यानंतर गुरूवारी विजय शंकरच्या दुखापतीची बातमीने सर्वांनाच हलवले. याबाबत जसप्रीत बुमराहने ताजे अपडेट दिले आहेत.

vijay shankar
विजय शंकर  |  फोटो सौजन्य: AP

साऊथम्पटन: भारतीय संघाचा ऑलराऊंडर विजय शंकरच्या पायाच्या अंगठ्याला बुधवारी सराव सत्रादरम्यान बॉल लागला आणि ज्यामुळे तो गुरूवारी सराव सत्रात सहभागी होऊ शकला नाही. जसप्रीत बुमराहचा यॉर्कर बुधवारी सरावादरम्यान शंकरच्या पायाला लागला आणि त्याला दुखापत झाली. टीमच्या सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार चिंता कऱण्याची कोणतीही गरज नसल्याचे म्हटले आहे. 

सूत्रांनी सांगितले, हा, विजयला त्रास झाला होता. मात्र ती दुखापत संध्याकाळपर्यंत बरी झाली. आशा आहे की काही चिंताजनक नसेल. बुमराहला जेव्हा विचारण्यात आले की नेटमध्ये आपल्याच फलंदाजांना थोडी हळू गोलंदाजी केली पाहिजे. तेव्हा ते म्हणाला, आम्हाला कोणत्याही फलंदाजाला दुखापतग्रस्त करायचे नसते. जेव्हा तुम्ही नेटमध्ये खेळता तेव्हा तुम्ही कोणत्याही फलंदाजाला हिट करू नको असे सांगित नाही. शंकरला बॉल लागला ही दुर्देवाची गोष्ट आहे. हा खेळाचा भाग आहे. मात्र तो आता ठीक आहे. 

अडखळत चालत होता विजय शंकर

गुरूवारी शंकर चप्पल घालताना थोडा अडखळत चालत होता. त्यानंतर त्याने जॉगिंगचाही प्रयत्न केला मात्र तो हे करू शकला नाही. यानंतर त्याने काही बेसिक अभ्यास केला तेव्हा अन्य क्रिकेटर सामान्य फिल्डिंग ड्रिल आणि नेट सत्रात सहभागी होत होते. शंकर भारतीय फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर निवडण्यात आला आहे. मात्र त्याला कोणत्याही स्थानावर वापरता येऊ शकते. 

बुमराहने व्यक्त केले दु:ख

धवनला झालेल्या दुखापतीबाबत बुमराहने दु:ख व्यक्त केले. धवनला दुखापतीमुळे वर्ल्डकप बाहेर व्हावे लागले. तो म्हणाला, धवन महत्त्वाचा सदस्य आहे आणि अनेक वर्षांपासून तो टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत आहे. खासकरून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्याचे रेकॉर्ड जबरदस्त आहेत. तो दुखापतग्रस्त झाला हे दुर्देवी आहे मात्र तुम्हाला पुढे जावेच लागते. 

राहुलची केली स्तुती

बुमराह म्हणाला, राहुलने स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे. तो कोणत्याही परिस्थितीत सामंजस्याने राहू शकतो. तो चौथ्या नंबरवरही खेळत होता. त्यात तो फिट झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो काही बॉल खेळला आणि त्याने चांगला सामना केला. तो परिस्थितीनुसार स्वत:ला बदलतो. तो वेगाने खेळू शकतो. त्यामुळे जर कोणी दुखापतग्रस्त झाले तर आम्हाला चिंता नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
World Cup: विजय शंकरच्या दुखापतीबाबत बुमराहने दिले ताजे अपडेट Description: Vijay Shankar Injury Update: शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकप २०१९मधून बाहेर पडल्यानंतर गुरूवारी विजय शंकरच्या दुखापतीची बातमीने सर्वांनाच हलवले. याबाबत जसप्रीत बुमराहने ताजे अपडेट दिले आहेत.
Loading...
Loading...
Loading...